घरताज्या घडामोडीदिवाळीनंतरही क्षयरोग कंत्राटी कामगार 'दिवाळी भेटी'पासून वंचित; मुख्यमंत्री, आयुक्तांच्या अश्वासनांची पूर्तता नाहीच

दिवाळीनंतरही क्षयरोग कंत्राटी कामगार ‘दिवाळी भेटी’पासून वंचित; मुख्यमंत्री, आयुक्तांच्या अश्वासनांची पूर्तता नाहीच

Subscribe

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या अश्वासनानुसार, मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळी बोनस देण्यात आलेला आहे. मात्र 490 क्षयरोग कंत्राटी कामगार दिवाळी संपली तरी आजही हक्काच्या ‘दिवाळी भेट’ मिळण्यापासून वंचित आहेत. यामागे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे कारस्थान असल्याचा आरोप पालिकेतील कामगार संघटनांच्या कामगार नेत्यांकडून करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेत 490 क्षयरोग कंत्राटी कामगार कर्मचा-यांना दिवाळी भेट देण्यासंदर्भात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना गेल्या 3-4 वर्षांपासून प्रयत्न करीत आहे, अशी माहिती कामगार नेते बाबा कदम यांनी दिली आहे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही पालिकेतील झारीतील शुक्राचार्य असलेल्या अधिकार्यांची नकारात्मक मानसिकता बाधक ठरत आहे. किमान यंदाच्या दिवाळीत तरी या 490 कामगारांना दिवाळी भेट मिळावी यासाठी कामगार संघटना, कामगार नेते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे मागणी लावून धरली. तेव्हा कुठे मुख्यमंत्री व पालिका आयुक्त यांनी सदर कंत्राटी कामगारांना ‘दिवाळी भेट’ म्हणून काही ठराविक रक्कम देण्याचे मान्य केले, अशी माहिती कामगार नेत्यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : राष्ट्रवादी कोणाची ? अन्यायाविरुद्ध लढत आहे, अजित पवार गटाकडून बोगस प्रतिज्ञापत्र – अभिषेक मनू सिंघवी

तसेच, यावर्षी कंत्राटी कामगारांना दिवाळी भेट देण्याबाबत संबधित अधिकाऱ्यांनी कोणतीही हालचाल न करता संबंधित फाईल दाबून ठेवली, असा आरोप कामगार नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळेच सदर कंत्राटी कामगारांना दिवाळी भेटीपासून वंचित राहावे लागले असून या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मुख्यमंत्री व आयुक्त यांनी दिलेल्या अश्वासनाला हरताळ फासला गेला आहे, असे कामगार नेत्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मात्र हक्काच्या दिवाळी भेटीसाठी 100 ते 150 कंत्राटी कामगार आयुक्तांची भेट घेण्यासाठी सोमवारी पालिका मुख्यालयात आले होते. तसेच मुंबई महापालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीचे बाबा कदम, सत्यवान जावकर, अशोक जाधव, वामन काविस्कर, दिवाकर दळवी, अॅड. प्रकाश देवदास, बा. शि. साळवी, के. पी. नाईक , शरद सिंह यांनी ही हजेरी लावली होती. त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन या क्षयरोग कंत्राटी कामगारांना तुम्ही आश्वासन दिल्यानंतरही यावर्षी दिवाळी भेट मिळाली नसल्याची तक्रार निवदनाद्वारे केली.

तसेच क्षयरोग निर्मूलन संदर्भात राष्ट्रीय कार्यक्रम सुरू झाला आहे. त्या कार्यक्रमावर काही परिणाम झाला तर त्याला पालिका प्रशासन जबाबदार असेल. प्रशासनाने याबाबत त्वरित सकारात्मक भूमिका घेऊन क्षयरोग कंत्राटी कामगारांना लवकरात लवकर दिवाळी भेट द्यावी, अशी मागणी कामगार नेत्यांनी केली आहे.

हेही वाचा : मुंबई मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना आहाराबाबत तज्ज्ञांद्वारे मिळणार मार्गदर्शन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -