घरमहाराष्ट्र...तर २०२४ नंतर निवडणुका होणार नाहीत, हुकूमशाही सुरू होईल; उद्धव ठाकरेंचा दावा

…तर २०२४ नंतर निवडणुका होणार नाहीत, हुकूमशाही सुरू होईल; उद्धव ठाकरेंचा दावा

Subscribe

ते म्हणाले, आताच वृत्त आले आहे की छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या घरावर छापा पडला आहे. याला लोकशाही म्हणावी का?. अमेरिकेतही राष्ट्राध्यक्षांच्या घरी छापा पडला होता. मुख्यमंत्र्यांच्या घरावर छापा टाकता. मग अमेरिकेत पडलेला छापाही तुम्हाला मान्य करावा लागेल. त्यामुळे आता आपण एकत्र यायला हवे. सध्या चोरांना राज्यप्रतिष्ठा देण्याचा प्रकार सुरु आहे. शिवसेना पक्ष व चिन्ह चोरलं तरी ठाकरे हे नाव ते कसं चोरू शकतात.

मुंबईः आज आमच्या पक्षावर ही वेळ आली. आमचे नाव आणि चिन्ह चोरले. देशभरात याचे पडसाद उमटले आहेत. शरद पवार तर सोबत आहेत. पण मला ममता बॅनर्जी यांचा फोन आला. देशातील अन्य बडे नेतेही माझ्याशी बोलत आहेत. माझ्याप्रमाणे उद्या कोणावरही अशी वेळ येऊ शकते. आताच जर एकत्र आलो नाही तर २०२४ नंतर निवडणुका होणार नाहीत. हुकुमशाही सुरु होईल, असा दावा उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केला.

शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आताच वृत्त आले आहे की छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या घरावर छापा पडला आहे. याला लोकशाही म्हणावी का?. अमेरिकेतही राष्ट्राध्यक्षांच्या घरी छापा पडला होता. मुख्यमंत्र्यांच्या घरावर छापा टाकता. मग अमेरिकेत पडलेला छापाही तुम्हाला मान्य करावा लागेल. त्यामुळे आता आपण एकत्र यायला हवे. सध्या चोरांना राज्यप्रतिष्ठा देण्याचा प्रकार सुरु आहे. शिवसेना पक्ष व चिन्ह चोरलं तरी ठाकरे हे नाव ते कसं चोरू शकतात.

- Advertisement -

पालिकेतील कार्यालयावर दावा करु शकत नाही.

विधिमंडळाच्या कार्यालयाचा ताबा घेतला ठिक आहे. पण महापालिकेत सध्या नगरसेवकचं नाहीत. त्यामुळे तेथील पक्ष कार्यालये बंद आहेत. ती कार्यालये कशी ताब्यात घेणार. तसे करता येणार नाही. कारण आमदार आणि खासदार सध्या आहेत. पण पालिकेत आता कोणीही लोकप्रतिनीधी नाही. त्यामुळे तेथील कार्यालयावर दावा केला जाऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

अमित शाह यांना शुभेच्छा

अमित शाह यांनी ४८ जागांचा संकल्प केला आहे. त्यांच्या सोबत जी आहे ती खरी शिवसेना नाही. कॉंग्रेसलाही एकेकाळी जनतेने नाकरलं आहे. त्याप्रमाणे गद्दारांनाही जनता त्यांची जागा दाखवेल. त्यामुळे शाह यांनी जो दावा केला आहे त्यासाठी त्यांना शुभेच्छा, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

न्यायालयावर विश्वास

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व चिन्हं शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. हा निर्णय मनमानी आहे. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. उद्या त्यावर सुनावणी आहे. तसेच १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरही उद्याच सुनावणी आहे. आम्हाला न्यायालयाकडून अपेक्षा आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -