खबरदारीचा इशारा म्हणून पुढील काही दिवस गेट वे ऑफ इंडियावर ‘नो एन्ट्री’

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्र किनारी सहा दिवसांपूर्वी एका संशयास्पद बोटीत शस्त्रे सापडली होती. त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून गेटवे ऑफ इंडिया सुद्धा पर्यटकांसाठी बंद करण्यात आहे आहे.

Get way of India

मुंबईचं सौंदर्यात भर घालणारी अनेक ठिकाणं आहेत. त्या सगळ्याच ठिकाणांना मुंबईसह राज्यभरातून आणि देशभरातून अनेक पर्यटक भ्रमंती साठी येतात. एवढंच काय तर चक्क परदेशातूनही मुंबई पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया (get way of india)हे ठिकाण अनेक पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. अनेक मुसाफिर मंडळींची पावलं गेट वे ऑफ इंडिया पाहण्यासाठी वळतात. मात्र हे गेट वे ऑफ इंडिया आता पुढचे काही दिवस पर्यटकांसाठी बंद असणार आहेत. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर(harihareshwar) समुद्र किनारी सहा दिवसांपूर्वी एका संशयास्पद बोटीत शस्त्रे सापडली होती. त्याच पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून गेटवे ऑफ इंडिया सुद्धा पर्यटकांसाठी बंद करण्यात आहे आहे.

हे ही वाचा – मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाश्यांचा खोळंबा

दरम्यान या संदर्भात पुढील माहिती मिळे पर्यंत गेट वे ऑफ इंडिया बंद असणार आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर(harihareshwar) समुद्रकिनाऱ्यावर माय लेडी हान नावाची संशयास्पद बोट सापडल्याची घटना घडली होती. या बोटीची तपासणी सुद्धा करण्यात आली होती. दरम्यान बोटीची तपासणी पूर्ण झाल्यांनंतर त्यात तीन AK-47 रायफल आणि अनेक राऊंड्स गोळ्या सापडल्या होत्या. ही सर्व शास्त्रास्ते जप्त सुद्धा करण्यात आली. खबगरदारीचा इशारा म्हणून मुंबईतील सुद्धा महत्वाची आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असेल गेट वे ऑफ इंडिया सुद्धा बंद करण्यात आले आहे.

हे ही वाचा –  मुंबई पालिकेकडून गणेशोत्सवासाठी १,९४७ मंडळांना परवानगी, तर ४१५ मंडळांचे अर्ज फेटाळले

काही दिवसांपूर्वी सरिहरेश्वरला सापडलेल्या संशयास्पद बोटी संदर्भात महाराष्ट्र एटीएसने आर्म्स अॅक्ट अंतर्गत अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल केला आहे. महाराष्ट्र एटीएस ने या प्रकरणाच्या संबंधित कंपनीशी बोलून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

हे ही वाचा –  गणेशोत्सवात ‘बेस्ट’च्या हेरिटेज बसद्वारे भाविकांना मुंबईतील गणेश दर्शन