पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात काळे कपडे परिधान करणाऱ्यांना नो एन्ट्री

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात काळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करुन निषेध करु नये यासाठी तपासणी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामध्ये तसेच कार्यक्रम स्थळी काळा रंगाचे कपड्यांवर बंदी असते.

No entry for those wearing black clothes in PM Modi dehu program
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात काळे कपडे परिधान करणाऱ्यांना नो एन्ट्री

पंतप्रधान नरेंद्र यांच्या देहू दौऱ्यामध्ये आता नवीन नियम समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुंबईत काही कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूमध्ये जाणार आहे. देहू दौऱ्यामध्ये काळे कपडे परिधान करणाऱ्यांना नो एंट्री असणार आहे. काळे कपडे परिधान केल्यास कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी नसेल. देहूमध्ये पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात काळ्या रंगाचे शर्ट, काळ्या रंगाच्या टोप्या, काळ्या रंगाचे मोजे, कुठलीही गोष्ट काळी चालणार नाही. एक व्यक्ती देहूमध्ये काळ्या रंगाचा शर्ट घालून कार्यक्रमाला आला होता. परंतु त्याला पोलिसांनी अडवले आहे. काळ्या रंगाचे कपडे असल्यामुळे त्या व्यक्तीला अडवण्यात आले आहे. या व्यक्तीला रोखण्यात आल्यानंतर हा नियम समोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देहू येथे कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात काळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करुन निषेध करु नये यासाठी तपासणी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामध्ये तसेच कार्यक्रम स्थळी काळा रंगाच्या कपड्यांवर बंदी असते. यावेळी कोणताही व्यक्ती किंवा पदाधिकारी काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये उपस्थित राहत नाही. जे काळे कपडे घालून येतात त्यांना कार्यक्रमात परवानगी दिली जात नाही. अशा व्यक्तींना काळ्या रंगाचे कपडे बदलून येण्याची सूचना देण्यात येते.

पंतप्रधान मोदी देहू दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे देहू आणि परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आला आहे. देहूतील मुख्य मंदिर परिसर, सभेचे ठिकाण आदी परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू मध्ये मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. तसेच वारकऱ्यांशीसुद्धा मोदी संवाद साधतील. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारसुद्धा उपस्थित असतील.


हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, असा असणार दौरा