घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री दालनात दुपारी दोनपर्यंत 'नो एन्ट्री', गर्दी नियंत्रणासाठी नवा फतवा

मुख्यमंत्री दालनात दुपारी दोनपर्यंत ‘नो एन्ट्री’, गर्दी नियंत्रणासाठी नवा फतवा

Subscribe

गुरुवारपासून हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मुख्यमंत्री दालनात गोंधळ निर्माण झाला होता.

मुंबई – मंत्रालयातील (Maharashtra Mantralay) सहाव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्री दालनात (Chief Minister Cabin) प्रचंड गर्दी होत असते. या गर्दीचं नियोजन (Crowd Management) करण्याकरता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला येणाऱ्यांना सहाव्या मजल्यावर फक्त दोननंतरच प्रवेश दिला जाणार आहे. तसंच, आमदारांबरोबर केवळ त्यांचा पीए गाडीतून मंत्रालयात प्रवेश करू शकतात. शिवाय, मुख्यमंत्र्यांना भेटायला येताना गळ्यात ओळखपत्र असणे आवश्यक असल्याचाही नियम करण्यात आला आहे. गुरुवारपासूनच या निर्बंधाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.


आपल्या विविध प्रश्न, प्रस्ताव आणि मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात प्रचंड गर्दी असते. तिथे पाय ठेवायलाही जागा नसते. त्यामुळे मंत्री आणि सचिवांनाही मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचताना कसरत करावी लागत होती. त्यामुळे सहाव्या मजल्यावर गर्दीवर नियंत्रण मिळवण्याकरता नियम करण्यात आला आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यासाठी असलेले चारही दरवाजे दुपारी दोन वाजेपर्यंत आतून बंद केले जाणार आहेत. तर, अभ्यागतांना हे दरवाजे दुपारी दोननंतर खुले केले जातील. तसंच, रांग लावून मुख्यमंत्री कार्यालयात त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. मंत्रालयातील अधिकारी, बाहेरून येणारे अधिकारी, पत्रकार यांना यापुढे गळ्यात ओळखपत्र अडकवून ठेवावे लागणार आहे. ओळखपत्राशिवाय दालनात प्रवेश दिला जाणार नाही, असे विविध नियम करण्यात आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मंत्रालयातील पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप, पण संतोष बांगरांचे कानावर हात

गुरुवारपासून हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मुख्यमंत्री दालनात गोंधळ निर्माण झाला होता.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -