घरमहाराष्ट्रउशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर नो एण्ट्री

उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर नो एण्ट्री

Subscribe

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने जारी केली नियमावली

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुरुवारी दहावी-बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहचणार्‍या विद्यार्थ्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागू शकते.

गेल्या वर्षीपर्यंत विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थितीत १० मिनिटे उशीर झाल्यानंतरही परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात होता. उशिरा येण्याच्या सवलतीचा लाभ घेऊन लेखी परीक्षेस उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. परीक्षा कॉपीमुक्त आणि सुरक्षीतरित्या पार पडावी यासाठी शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना २२ महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

- Advertisement -

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३ दरम्यान, तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च २०२३ दरम्यान घेतली जाणार आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात ११ वाजता, तर दुपारी ३ वाजता घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सकाळी १०.३०, तर दुपारी २.३० वाजता उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. यासंदर्भातील पत्रदेखील मंडळाने सर्व शाळांना पाठवले आहे.

उत्तरपत्रिका लिहिण्याआधी विद्यार्थ्यांकरिता सूचना
-परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पेपरच्या वेळेआधी अर्धा तास उपस्थित राहावे लागेल.
-विद्यार्थ्यांना दररोज प्रवेशपत्र आणि ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य असेल.
-पर्यवेक्षक, केंद्रसंचालक व केंद्राला भेट देणार्‍यांनी मागणी केल्यास प्रवेशपत्र, ओळखपत्र दाखवावे.
-परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही परीक्षार्थ्यास परीक्षा संपेपर्यंत परीक्षागृहाबाहेर जाता येणार नाही, मात्र अपवादात्मक परिस्थितीत परीक्षागृहाबाहेर जायचे असल्यास परीक्षार्थ्याने प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे जमा करणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -