घरमहाराष्ट्र13 लाख खर्चाच्या उद्यानात एकही फुलझाड नाही

13 लाख खर्चाच्या उद्यानात एकही फुलझाड नाही

Subscribe

इंदिरा गांधी नगर उद्यानाची दुर्दशा

येथे पर्यटक संख्या वाढण्यासाठी अनेक विकास कामे सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून नगर पालिकेने इंदिरा गांधी नगर येथील 13 लाख रुपये खर्च करून 30 फूट लांब आणि 30 फूट रुंद असे उद्यान उभारले आहे. मात्र ठेकेदाराने बांधकामाखेरीज उद्यानाला शोभेल असे कोणतेही काम केले नसून, तेथे एकही फुल झाडे नाही, तर दुसरीकडे गवताच्या कार्पेटवरील गवत निघून गेल्याने 13 लाख मातीत गेल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे.

शहरात विशिष्ट ठिकाणी अशी उद्याने तयार केली जात आहेत. मात्र इंदिरा गांधी नगर उद्यान हे नावाचेच ‘उद्यान’ राहिल्याने नगर पालिकेच्या सुशोभिकरणाच्या धोरणालाच हरताळ फासला आहे. वर्षभरात उद्यानात विशेष असे कोणतेच काम झालेले नाही. लावण्यात आलेली झाडे शोभेची असून, त्यांचे प्रमाणही अत्यल्प आहे. विशेष म्हणजे यामध्ये एकही फुलझाड नाही. स्वाभाविक हे उद्यान पाहून स्थानिकांप्रमाणे पर्यटकही नाराजी व्यक्त करीत आहेत.

- Advertisement -

जांभा दगडापासून बनविलेल्या उद्यानात चालण्यासाठी ट्रॅक असून, उर्वरित जागेत गवताचे कार्पेट आहे. उद्यानात कोणतीही आसन व्यवस्था नसून नगर पालिकेने दोन बाकडी ठेवली आहेत. त्यामुळे ठेकेदाराने तेरा लाख रुपयांचे कोणते काम केले, असा सवाल स्थानिक नागरिकांना पडला आहे.

नगर पालिकेच्या या उपक्रमाचे सर्वांनीच स्वागत केले. मात्र या उद्यानात लाखो रुपये खर्च करून बांधकामाखेरीज कोणतेही काम केलेले दिसत नाही. तेथे फुलझाडे नाहीत, गवताचे कार्पेट सुकले आहे, मुलांना खेळण्यासाठी खेळणी नाहीत, बसण्यासाठी बाकडी नाहीत. मग नगर पालिकेने ठेकेदाराला आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी या उद्यानाचा घाट कशासाठी घातला, हे कोडे आहे. -अक्षय नाईकरे, स्थानिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -