घर महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूका नको: ऐतिहासिक चिरनेर गाव ग्रामसभेचा ठराव

ग्रामपंचायत निवडणूका नको: ऐतिहासिक चिरनेर गाव ग्रामसभेचा ठराव

Subscribe

मध्य कोकणात रायगड जिल्हयाच्या उरण तालुक्यातील चिरनेरमध्ये नवसाला पावणारा श्री क्षेत्र चिरनेर महागणपती भैरव मंदिर, शिव मंदिर आणि देवतळे प्रेक्षणिय आहे. शिवाय येथे बापूजी देव मंदिर, खंडोबा मंदिर, कातळपाडा येथील दत्त मंदिर अशी धार्मिक ओळख आहे. तर चिरनेरचा ब्रिटीशांच्या काळात जंगल सत्याग्रह देखील झाला होता.

मध्य कोकणात रायगड जिल्हयाच्या उरण तालुक्यातील चिरनेरमध्ये नवसाला पावणारा श्री क्षेत्र चिरनेर महागणपती भैरव मंदिर, शिव मंदिर आणि देवतळे प्रेक्षणिय आहे. शिवाय येथे बापूजी देव मंदिर, खंडोबा मंदिर, कातळपाडा येथील दत्त मंदिर अशी धार्मिक ओळख आहे. तर चिरनेरचा ब्रिटीशांच्या काळात जंगल सत्याग्रह देखील झाला होता. ऐतिहासिक वारसा आणि निसर्ग संपदा लाभलेल्या चिरनेरची ओळख मागील काही वर्षात नैसर्गिक आपत्तींनी ग्रासलेले चिरनेर अशी झाली आहे. (No Gram Panchayat Elections Historic Chirner Village Gram Sabha Resolution )

पुरापासून होणारी हानी आणि सत्याग्रह स्थळापर्यत पक्का रस्ता न वारंवार मागणी करुनही कागदावरच राहिल्याने ऐतिहासीक चिरनेर गावाच्या ग्रामसभेने ग्रामपंचायत निवडणूका घेण्यात येवू नये असा ठराव केला आहे तर ग्रामसभेत २५ सप्टेंबर २०२३ रोजी होणारा ९३ वा स्मृतीदिन हुतात्म्यांन विषयी आदर व त्यांच्या बलिदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासठी फक्त हुतात्म्यांना मानवंदना व श्रद्धांजली अर्पण करण्यापुरताच ठेवण्याचा निर्णय देखील ग्राम सभेने घेतला आहे.

- Advertisement -

एकी राजकीय नेत्यांकडून जनतेच्या विकासासाठी मुलभूत प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी आम्हीं सत्तेत आलो असे सांगितले जाते.परंतु प्रत्यक्षात मात्र वास्तव काय आहे. हे ऐतिहासिक ओळख असणार्‍या चिरनेरमधील समस्यांमुळे समोर आहे.सात वर्षापुर्वी आलेल्या पुराने चिरनेर येथील एका गरिब पती-पत्नीचे निधन झाले आहे. दरवर्षी येणार्‍या पुराचे पाणी अनेकांच्या घरात गेल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. पुरानंतर चिरनेरमध्ये रोगराई पसरते त्यामुळे येथील जनता पुरामुळे भयभीत झाली आहे. पुरपस्थितीवर नियंत्रणासाठी त्याचप्रमाणे पुराचे पाणी गावातील लोकवस्तीत जाऊ नये यासाठी शासनस्तरावर कोणतीही उपाय योजना करण्यात न आल्याने ग्रामस्थांमध्ये सरकार विरोधात संताप पसरला आहे.गेली कित्येक वर्ष मागणी करून सुद्धा चिरनेर प्रवेशद्वार ते ज्या ठिकाणी ब्रिटीश सरकार विरूध्द येथील जनतेने सत्याग्रह केला.त्या ठिकाणी म्हणजेच अक्कदेवीवाडी येथे अद्यापही पक्का रस्ता न झाल्याने ग्रामसभेने हा ठराव केला आहे.

(हेही वाचा: निधीच्या दुष्काळातून मराठवाड्याची ‘मुक्ती’! )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -