घरCORONA UPDATEनाशकात लगेचच लॉकडाऊन नाही; बेड्स साठी कॉल सेंटर सुरु करणार

नाशकात लगेचच लॉकडाऊन नाही; बेड्स साठी कॉल सेंटर सुरु करणार

Subscribe

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती; कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा

नाशिक- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना आता बेड मिळणेही मुश्किल झाले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शासनाच्या वतीने कॉल सेंटर सुरु करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली. नाशिक शहरात लगेचच लॉकडाऊन करणार नाही असे स्पष्ट करतानाच भविष्यात गरज पडल्यास लॉकडाऊनचा विचार होईल असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनाची शुक्रवारी (दि. २४) बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना राजेश टोपे यांनी सांगितले की, नाशिकमध्ये सहजपणे बेड उपलब्ध होण्यासाठी कॉल सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या माध्यमातून सामान्य लोकांना संपर्क क्रमांकावर किंवा वर्तमानपत्राव्दारे उपलब्ध बेडविषयी माहिती मिळू शकेल. त्याच प्रमाणे डेथ ऑडिट कमिटीचीही स्थापना करण्यात आली आहे.

राजेश टोपे यांनी सांगितलेले महत्वाचे मुद्दे

  • आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांची भरती मेरिट पद्धतीने केली जाईल.
  • इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाईन वाढवणार
  • डेड ऑडिट कमिटीची स्थापना
  • अ‍ॅण्टीजेन टेस्ट वाढवणार
  • डॉक्टर्सच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आपल्या कामकाजात आयएमएला सहभागी करुन घेणार
  • बिलाच्या बाबतीत खासगी हॉस्पिटलची मनमानी खपवून घेणार नाही
  • मालेगावमधील बर्‍या झालेल्या कोरोना रुग्णांचा प्लाझ्मा वापरुन नाशिकमध्ये प्लाझ्मा बँक सुरु करणार
  • नाशिक, कोरोना, कोवीड, आरोग्य मंत्री राजेश टोपे, शरद पवार, राष्ट्रवादी, जिल्हाधिकारी
  • नाशिकमध्ये लगेचच लॉकडाऊन नाही; बेडसाठी कॉल सेंटर सुरु करणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -