घरमहाराष्ट्र१५०० स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधण्यासाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता नाही!

१५०० स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधण्यासाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता नाही!

Subscribe

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली.

आता राज्यात १५०० स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधण्यासाठी कसल्याही परवानगीची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे सध्या घर बांधण्याचा विचार करणार्‍या लोकांचा सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याचा त्रास वाचणार आहे. ही घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली. औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. ‘३१ डिसेंबर २०२० पर्यंतची सर्व बांधकामे नियमित होतील. त्याचबरोबर येथून पुढे जर १५०० स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधायचे असेल तर महापालिकेच्या परवानगीची गरज भासणार नाही’, असे शिंदे यांनी सांगितले.

५५ हजार कुटुंबांना फायदा

नगरविकास विभागाच्या या निर्णयामुळे अनेक छोट्या ग्राहकांचा सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याचा त्रास वाचणार आहे. याचा फायदा राज्यातील ५५ हजार कुटुंबांना फायदा होणार आहे. याव्यतिरिक्त ३ हजार स्क्वेअर फुटापर्यंत घरे बांधणार्‍यांसाठी १० दिवसांत परवानगी देण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

औरंगाबादच्या नामकरणाला विरोध नको

एकनाथ शिंदे यांनी यावेळी इतर विषयांवरही भाष्य केले. औरंगाबादचे नामकरण करण्याला कुणाचाही विरोध असता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करावे ही जनतेची भावना असून आम्ही जनतेच्या भावनेसोबत आहोत. त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण होणार आहे. निवडणूक आली की संभाजीनगर या नावाबाबत चर्चा होते असे विरोधक म्हणतात. परंतु, निवडणुकीचा आणि संभाजीनगरचा काही संबंध नाही, असेही शिंदे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -