घरCORONA UPDATE'कोरोनामुळे मृत्यू झाले नाहीत, सर्व मृत्यू नैसर्गिक', प्रकाश आंबेडकरांचा संतापजनक दावा

‘कोरोनामुळे मृत्यू झाले नाहीत, सर्व मृत्यू नैसर्गिक’, प्रकाश आंबेडकरांचा संतापजनक दावा

Subscribe

कोरोनामुळे संपुर्ण विश्वात हाहाकार उडालेला आहे. भारतातही ३७ लाख रुग्ण आढळले असून त्यापैकी ६६ हजार रुग्णांना आपला जीव या विषाणूमुळे गमवावा लागला आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना हे आकडे चुकीचे वाटत असून “कोरोना विषाणूमुळे लोकांचा मृत्यू होतच नाही. आतापर्यंत झालेले सर्व मृत्यू हे नैसर्गिक आहेत”, असा संतापजनक दावा त्यांनी केला आहे. बीबीसी मराठी या संकतेस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलेले आहे. सोमवारी आंबडेकर यांनी पंढरपुरातील विठ्ठल मंदिर खुले करावे या मागणीसाठी आंदोलन केले होते.

महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास राज्या आतापर्यंत सर्वाधिक २४ हजार मृत्यू कोरोना विषाणूमुळे झालेले आहेत. तर कोरोनाबाधित रुग्णसंख्या आठ लाखांच्या घरात पोहोचली आहे. मात्र प्रकाश आंबेडकर यांना या आकडेवारीवर विश्वास नाही. “निसर्गाच्या नियमानुसार लोकांचा मृत्यू होत आहेत. जो जन्माला आला तो मरणारच आहे. जर दहा कोटी लोकांमध्ये २००-२५० लोकांचा जर मृत्यू होत असेल तर त्यात नवीन काय? यापेक्षा अधिक मृत्यू झाले तर मी कोरोनाचा प्रभाव मान्य करेल”, असा दावा आंबडेकर यांनी केला आहे.

- Advertisement -

आंबेडकर पुढे म्हणाले की, “आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकाही मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल समोर आलेला नाही. त्यामुळे होणारे मृत्यू कोरोना विषाणूमुळेच होत आहेत का? असे ठामपणे म्हणता येत नाही, त्या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही. कारण अनेक माणसांना आम्ही जगताना पाहतोय.”

पंढरपुरातील विठ्ठल मंदीरासहीत सर्वच धार्मिक स्थळे खुली करावीत, या मागणीसाठी प्रकाश आंबडेकर यांनी सोमवारी पंढरपुर येथे आंदोलन केले. यावेळी झालेल्या तुफान गर्दीमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाची भीती व्यक्त केली जात होती. या विषयासंबंधी बीबीसी या संकेतस्थळाने प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया विचारली असताना त्यांनी गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो हा दावा फेटाळून लावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -