घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातून कुणीही पूनावालांना धमक्या देणार नाही, ही आमची परंपरा नाही - राऊत

महाराष्ट्रातून कुणीही पूनावालांना धमक्या देणार नाही, ही आमची परंपरा नाही – राऊत

Subscribe

सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी मला भारतातील काही राजकीय नेते धमक्या देत असल्याचं विदेशी माध्यमाला मुलाखत देताना सांगितलं. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातून कुणीही पूनावालांना धमक्या देणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. दहशत निर्माण करणं ही आमची परंपरा नाही, असं देखील राऊत म्हणाले.

अदर पूनावाला यांनी धमक्यांबाबत काही वक्तव्य केलं असेल तर ते अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रातून अशा प्रकारच्या कोणीही धमक्या देणार नाही. महाराष्ट्राची ही परंपराच नाही. किंबहुना महाराष्ट्राला गर्व राहिला की देशाला आरोग्यविषयक कवचकूंडल निर्माण करणारी जी लस आहे, त्याची निर्मिती महाराष्ट्रात होते याचा गर्व राहील. महाराष्ट्रातील कोणतेही नेते, राजकीय पक्ष धमक्या देऊ शकत नाही. महाराष्ट्राची अशी धमक्या देणं दहशत निर्माण करण्याची परंपराच नाही. जर कोणी असं केलं असेल तर त्यासंद्रभात केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने खोलवर तपास करावा, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

बंगालमधील हिंसाचाराची घटना चिंताजनक

पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटना चिंताजनक आहेत. बंगालच्या जनतेनं मममता बॅनर्जी यांना जोरदार बहुमत प्राप्त करुन दिलं आहे. तिथल्या लोकांनी जो निर्णय दिला आहे तो ऐतिहासीक आणि क्रांतिकारक आहे. देशाच्या मनातील भावना तिथे उमटली आहे. असं असताना दोन्ही बाजूने संयम बाळगणं गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -