राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा, म्हणाले…

सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत

मुंबई | “राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, तसे केल्यात त्यावर पोलीस कारवाई होईल”, असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिला आहे. सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतील (Cabinet meeting) निर्णय माध्यमांना सांगितले.

अकोल्यासंदर्भात मुखमंत्री म्हणाले, “महाराष्ट्रात सर्व समाज धर्म गुण्यागोविंदाने राहतात. कोणीही जातीय तणाव निर्माण करण्याचा आणि कायदा हाता घेण्याचा प्रयत्न करू नये. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची आहे. काही समाजकंटक जातीय तणाव निर्माण करण्याचा आणि द्वेष भावना पसरविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करत असेल. यावर राज्य सरकार कठोर कारवाई गृहविभाग, पोलीस विभागाच्या माध्यमातून होईल. यामुळे कायदा सुव्यस्था राज्यात राखली गेली पाहिजे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशा प्रकारचे आवाहन मी केलेले आहे. हा महाराष्ट्र आहे, यात शांतता, कायदा-सुव्यवस्था आबादीत राखण्याचे काम सरकारचे आहे. तसेच सर्व समाजाने देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.”