घरमहाराष्ट्रविखे-थोरात मतभेद चव्हाट्यावर; काँग्रेसच्या पोस्टरवरुन विखेंचा पत्ता कट

विखे-थोरात मतभेद चव्हाट्यावर; काँग्रेसच्या पोस्टरवरुन विखेंचा पत्ता कट

Subscribe

सोनिया गांधी ते बाळासाहेब थोरात आणि थोरातांचे मेव्हणे आमदार सुधीर तांबे यांचा फोटो देखील बोर्डवर छापण्यात आला आहे. मात्र विखे-पाटील यांचा फोटो कट करण्यात आला आहे.

अहमदनगरमध्ये विखे-थोरात यांचेतील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. जिल्हयातील काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न यामुळे सध्या उपस्थित होत आहे. राधाकृष्ण विखे-पाटील हे कॉग्रेसचे स्टार प्रचारक असताना श्रीरामपूर येथील प्रचार कार्यालयाच्या मुख्य बोर्डवर त्यांना स्थान देण्यात आलं नाही. सोनिया गांधी ते बाळासाहेब थोरात आणि थोरातांचे मेव्हणे आमदार सुधीर तांबे यांचा फोटो देखील बोर्डवर छापण्यात आला आहे. जाणुन बूजून विखे-पाटलांचा फोटो का डावलला असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे विखे-थोरात यांच्यात असलेला वाद पुन्हा समोर आला आहे.

विखे-पाटील कांबळेंपासून दूर

महत्वाची बाब म्हणजे श्रीरामपुर येथे काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचार कार्यालयाच उद्घाटन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरांत यांच्या हस्ते करण्यात आले आहे. काँग्रेसचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे हे विखे समर्थक मानले जातात. मात्र कांबळेंनी बाळासाहेब थोरातांची मदत घेतल्याने विखे-पाटील हे कांबळेपासून दुर आहेत. विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर दुसरीकडे विखे पुत्र सुजय विखे भाजपात गेल्यानंतर विखे पाटलांच्या काँग्रेस निष्ठेवर थोरातांनी हल्लाबोल केला.

- Advertisement -

विखे-पाटील १५ दिवसात घेणार मोठा निर्णय

सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाने राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत आले आहेत. विखेंपेक्षा मोठं होण्याची संधी यामुळे थोरातांकडे आली आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुढच्या १५ दिवसामध्ये मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे विखे-पाटील नेमकी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर नगरमध्ये थोरातांनी आख्खी प्रचार यंत्रणा कांबळे यांच्या पाठीशी उभी केली आहे. सर्व सुत्रे थोरात यांच्या यंत्रणेने हातात घेतली आहे. थोरात यांनी फायदा उचलत काँग्रेस राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना एकत्र करत थोरातांनी विखे पाटील यांच्या विरोधकांची मोट बांधली आहे. विखे थोरात यांच्या संघर्षात आता पक्षाच भल होत की अधोगती हे पाहण औत्सुक्याच ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -