घरदेश-विदेशआम्ही महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही - येडियुरप्पा

आम्ही महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही – येडियुरप्पा

Subscribe

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान केल्याने हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

आम्ही महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादामध्ये एका माथेफिरूने एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळीने ठार करण्याचे वक्तव्य केले. त्यामुळे सीमा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान केल्याने हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले येडियुरप्पा

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्र आणि कर्नाटकला देण्यात आलेला भाग महाजन आयोगाने स्पष्ट केला आहे. त्यामुळे आम्ही एक इंचही जमीन देणार नाही.”

- Advertisement -

एन.डी. पाटील यांचे विधान

दरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वादग्रस्त विधानाचा ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी समाचार घेतला आहे. येडियुरप्पा यांनी केलेले विधान दुर्दैवी म्हणावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे हा विषय त्यांच्या अधिकारात येत नाही. त्यांची भूमिका आडमुठेपणाची आहे. यावर सुप्रीम कोर्ट निवाडा करणार आहे. केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार सीमाभागाच्या प्रश्नावर आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत, असे एन.डी. पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा – २६ मंत्री, १० राज्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ विस्तार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -