घरताज्या घडामोडीभाजपबद्दल सहानुभूती नाही; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुनावले

भाजपबद्दल सहानुभूती नाही; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुनावले

Subscribe

आमच्यासोबत त्यांनी ३० वर्षे काढली.पण आता फूट पाडली,चिन्ह,नावही चोरले. ते शिवसेना संपवायला निघाले आहेत. टिळक घराण्याचा वापर करून आता त्यांनी फेकून दिले.लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला सहानुभूती म्हणून उमेदवारी दिली.

मुंबई : आमच्यासोबत त्यांनी ३० वर्षे काढली.पण आता फूट पाडली,चिन्ह,नावही चोरले. ते शिवसेना संपवायला निघाले आहेत. टिळक घराण्याचा वापर करून आता त्यांनी फेकून दिले.लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला सहानुभूती म्हणून उमेदवारी दिली. पण ही सहानुभूती हे थोतांड आहे.गिरीश बापट हे गंभीर आजारी आहेत. त्यांच्या नाकात ऑक्सिजनच्या नळ्या असतानाही त्यांना प्रचारासाठी उतरविण्यात आले हा अमानुषपणा आहे. तुमच्या मनात जर आमच्याबद्दल सहानुभूती नसेल तर तुमच्या बद्दलही आमच्या मनात सहानुभूती नाही, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी भाजपला नाव न घेता सुनावले.

पुण्यातील कासबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार, आज शुक्रवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मतदारांशी संवाद साधला. यावेळी भाजपवर हल्लाबोल करताना ठाकरे यांनी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.या निकालानंतर राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होऊ शकतील, अशी शक्यताही वर्तवली.

- Advertisement -

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला ठाकरे यांनी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहिली. काही जण म्हणतात ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती.पण तसे वातावरणही पाहिजे.मग लोकमान्यांच्या घरातल्यांना दुर्लक्षित करून दुस-यांना उमेदवारी देण्यात आली.मग सहानुभूती कुठे गेली? आपला जीव एका गोष्टीने तळमळला.भाजपत असले तरी गिरीश बापट यांचा उमेदवारीचा काळ मी पाहिला आहे. क्रूरतेचा कळस म्हणजे गिरीश बापट आजारी असताना ऑक्सिजनच्या नळ्या नाकात घालून प्रचाराला उतरवले.ही काय लोकशाही म्हणायची? असा सवाल ठाकरे यांनी केला.

शिवसैनिक काँग्रेसला,राष्ट्रवादीला मतदान करणार का असा अपप्रचार कोल्हापूरमध्ये करण्यात आला होता. मग शिवसैनिकांनी भाजपला मतदान नव्हते केले का?अमानुषपणे जर भाजप वागवत असेल अशा भाजपला मदत होता कामा नये.ती जर केली गेली तर शिवसेनेचे नाव लावता कामा नये, असेही ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बजावले.

- Advertisement -

आमच्या शहर प्रमुख सचिन भोसलेवर वार केले ही लोकशाही आहे का?आपल्याला गृहीत धरून जर कोणी राजकारण करत असेल तर ते गाडून टाकावे लागेल.कसबा आणि चिंचवडपासून सुरूवात करावी लागेल.आज त्यांच्यासोबत जे गद्दार गेले त्यांच्यावरही आरोप लागले. पण त्यांच्याकडे गेल्यानंतर चौकशा बंद.मग एकनाथ खडसे यांची का शिकार केली.पक्षात स्पर्धा नको, मग त्यांचे खच्चीकरण करायचे.आमच्यासोबत जे आहेत त्यांच्यावर चौकशा. मग तुमच्यासोबत जे गेले त्यांच्याही चौकशा करा, असे आव्हान ठाकरे यांनी भाजपला दिले.चिंचवडला राष्ट्रवादी आणि कसब्यात काँग्रेसला विजयी करावेच लागेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.


हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या भाषणाची नवी शैली; हसत-खिदळत सरकारवर राग आवळला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -