घरताज्या घडामोडीमराठी साहित्य संमेलनात आता 'नो व्हॅक्सिन, नो एण्ट्री'

मराठी साहित्य संमेलनात आता ‘नो व्हॅक्सिन, नो एण्ट्री’

Subscribe

जिल्हा प्रशासनाचा निर्णय, बालकांना मात्र सक्तीतून वगळले

नाशिक । कोरोनाच्या सावटामुळे पुढे ढकलण्यात आलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ डिसेंबर रोजी आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात होत आहे. संमेलनासाठी कुसुमाग्रजनगरी सज्ज होत असून आता संमेलनावर कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हारसचे सावट आहे. मात्र संमेलनातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरीता ‘नो व्हॅक्सिन, नो एण्ट्री’ धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे संमेलनात येणार्‍यांना आता लस प्रमाणापत्र बंधनकारक राहणार आहे.

जगभरात दहशत निर्माण करणार्‍या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे साहित्य संमेलनाचे काय होणार,याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. एकीकडे साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे. भव्यदिव्य मंडप टाकण्यात येत आहेत. वाद-रुसवे फुगवे जोडीला आहेतच आहेत. मात्र, संमेलनाला अजूनही चार दिवस आहेत. त्यातच कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूने प्रशासनासह आयोजकांची चिंता वाढवली असून मुख्य सभामंडपाची आसन क्षमता १४ हजार आहे. ती नव्या नियमाप्रमाणे आता ७ हजार करण्यात आली आहे. यासोबतच आता संमेलनात येणार्‍यांना लस प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता ‘नो व्हॅक्सिन, नो एण्ट्री’ हे धोरण अवलंबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

- Advertisement -

अद्याप लहान मुलांचे व्हॅक्सिन उपलब्ध नसल्याने बालकुमार मेळाव्यात बालकांना सहभागी होण्याबाबत कोणतेही निर्बंध नसतील. परंतु संमेलनात येणारया प्रत्येकाला किमान एक तरी लस घेणे क्रमप्राप्त असणार आहे अन्यथा संमेलस्थळी प्रवेश दिला जाणार नाही असेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

लस प्रमाणपत्राची सक्ती करावी

सध्या कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूवर फक्त एकावर एक दोन मास्क घालणे, लसीकरण हाच पर्याय उपलब्ध आहे. साहित्य संमेलनासाठी नो व्हॅक्सिन, नो एण्ट्री धोरण अवलंबविण्यात येणार आहे. संमेलनात येणार्‍या प्रत्येकाने किमान एक तरी डोस घेणे आवश्यक आहे. तसेच ज्यांना लस घेउन ८४ दिवस पूर्ण झाले आहे त्यांनी तातडीने दुसरा डोस घ्यावा. बालकुमार मेळाव्याला मात्र लसीची सक्ती नसेल. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -