Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र RTO Rules: एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन आणताना नोंदणी करणं आवश्यक

RTO Rules: एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहन आणताना नोंदणी करणं आवश्यक

जाणून घ्या RTO चे नियम

Related Story

- Advertisement -

कोणतेही वाहन मग ते दुचाकी असो किंवा चारचाकी ते खरेदी केल्यानंतर त्या त्या ठिकाणचे आरटीओ ऑफिस अर्थात परिवहन विभाग त्या वाहनाची नोंद करून घेतो. आणि या विभागाकडून प्रत्येक वाहनाला ठराविक क्रमांक देण्यात येतो. साधारण अशा प्रकारची प्रक्रिया वाहन क्रमांक मिळण्याची असते. मात्र जेव्हा आपण आपल्या नोंदणीकृत वाहन केलेल्या परिवहन विभाग कार्यालयाच्या हद्दीतून दुसऱ्या वाहन परिवहन विभागाच्या हद्दीत आपलं वाहन घेऊन स्थलांतर करतो तेव्हा आपल्याला काही प्रशासकीय प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. म्हणजेच ज्यावेळी आपण बऱ्याच दिवसांसाठी एका परिवहन कार्यलयाच्या हद्दीतून दुसऱ्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीत जातो, यासह एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वास्तव्यास जातो, त्यावेळी आपल्या वाहनाला स्थलांतर झालेल्या राज्यात नोंदणी करून घेणे, आता आवश्यक असणार आहे.

जाणून घ्या RTO चे नियम

ज्या आरटीओ कार्यालयाच्या हद्दीत आपले वाहन नोंदणीकृत आहे. त्या ठिकाणाहून एक “एनओसी” घ्यावी लागते. त्यानंतर ही “एनओसी” ज्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीत आपल्याला जायचे आहे. त्या कार्यालयात जमा करावे लागते.

- Advertisement -

नव्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीतले आपले वास्तव्य एक वर्षापर्यंतचे असेल तर वाहन मालक म्हणून “फॉर्मल ट्रान्स्फर” म्हणजेच “एफटी डिक्लेरेशन” आपल्याला करावे लागते. त्या वाहनासाठीचे रोड टॅक्स आणि इतर शुल्कदेखील आपल्याला जमा करावे लागते. ते केल्यानंतर आपण आपल्या मूळ वाहन नोंदणी क्रमांकावरच त्या नव्या ठिकाणी वाहन चालवू शकतो, असा RTO चा नियम आहे.

जर दुसऱ्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीतले आपले वास्तव्य एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असेल तर फॉर्मल ट्रान्स्फरच्या प्रक्रियेऐवजी आपल्या “रिएसाईन्डमेन्ट ऑफ मायग्रेटेड व्हेईकल” म्हणजेच “आरएमए डिक्लेरेशन” ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

- Advertisement -

रोड टॅक्ससह इतर शुल्क भरल्यानंतर आपल्याला वाहनाला त्या नव्या परिवहन कार्यालयाच्या हद्दीतील नवा वाहन नोंदणी क्रमांक दिला जातो. मात्र जो पर्यंत आपण त्या नव्या ठिकाणी आहोत तोपर्यंत तो नवा वाहन नोंदणी क्रमांक आपल्याला उपलब्ध करून दिला जातो.

जेव्हा आपल्या मूळ ठिकाणी आपण परततो, तेव्हा आपल्याला आपला जुना वाहन नोंदणी क्रमांक पुन्हा दिला जातो.

 

- Advertisement -