Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र क्रिकेट खेळताना हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू

क्रिकेट खेळताना हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू

नॉन स्ट्राईकवर उभ्या असणार्‍या फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Related Story

- Advertisement -

क्रिकेटच्या भर मैदानात बॅटिंग सुरू असतानाच नॉन स्ट्राईकवर उभ्या असणार्‍या फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने (हार्ट अ‍ॅटॅक) मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

जुन्नर तालुक्यात बोरी बुद्रुक जवळच्या जाधववाडी येथे स्वर्गीय मयुर चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. दोन दिवस या ठिकाणी क्रिकेटचे सामने सुरू आहेत. आज दुपारी ओझर संघ व जांबुत संघ हा सामना चालू असताना ओझर संघाचा टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडू व कॅटवे ओतुर संघाचा एक माजी खेळाडू धोलवड(ता.जुन्नर ) गावचा बाबू नलावडे वय वर्ष 47 हा फलंदाजी करत असताना अचानक मैदानावर हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -