घरताज्या घडामोडीशिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संप पुकारणार

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संप पुकारणार

Subscribe

महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. जुनी पेन्शन, आश्वासित प्रगती योजना, शिक्षकेतर कर्मचारी भरती, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी आदी. मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संप पुकारणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सुद्धा लेखी आश्वासन मागण्यांसंदर्भात दिले जावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आज विद्यापीठात, महाविद्यालयात कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. मुंबईत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने मुंबईतील आज अनेक महाविद्यालय बंद, विद्यार्थ्यांच्या परीक्षांना या आंदोलनामुळे फटका बसला आहे.

- Advertisement -

राज्यातील अकृषी विद्यापीठं त्यासोबतच महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने आज एक दिवसाच्या संपावर गेले. बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र, जोपर्यंत मागण्या लेखी मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने घेतला आहे .

बारावीच्या सध्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. मात्र, लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याने याचा फटका पदवी त्यासोबतच बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसू शकतो.

- Advertisement -

हेही वाचा : विजयदुर्ग नळपाणी योजना ठप्प; प्रशासनासह लोकप्रतिनिधीही गप्प!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -