Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रMNS : निवडणुका गेल्या तेल लावत, राजकीय पक्ष मेले तरी चालतील, पण...;...

MNS : निवडणुका गेल्या तेल लावत, राजकीय पक्ष मेले तरी चालतील, पण…; राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन

Subscribe

प्रकृती बिघडल्याने राज ठाकरे यांनी भाषण न करताच भिवंडीतली सभा शुक्रवारी (15 नोव्हेंबर) आटोपती घेतली होती. मात्र आज ते नाशिक दौऱ्यावर गेले. यावेळी त्यांनी निवडणुका गेल्या तेल लावत. राजकीय पक्ष मेले तरी चालतील. पण महाराष्ट्र जगला पाहिजे, असे मोठे वक्तव्य केले.

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी आता फक्त तीन दिवस बाकी असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार प्रचार होताना दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढणाऱ्या मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हेही आपल्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत. प्रकृती बिघडल्याने राज ठाकरे यांनी भाषण न करताच भिवंडीतली सभा शुक्रवारी (15 नोव्हेंबर) आटोपती घेतली होती. मात्र आज ते नाशिक दौऱ्यावर गेले. यावेळी त्यांनी निवडणुका गेल्या तेल लावत. राजकीय पक्ष मेले तरी चालतील. पण महाराष्ट्र जगला पाहिजे, असे मोठे वक्तव्य केले. (Raj Thackeray appeals to voters to save Maharashtra in a meeting in Nashik)

नाशिक येथील सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसती पकपक.. निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो कंटाळवाण्या असतात. कधीतरी भाषण करणं ठीक असतं. पण निवडणुकीत सकाळ, संध्याकाळ तेच बोलायचं. त्यामुळे निवडणुका गेल्या तेल लावत. राजकीय पक्ष मेले तरी चालतील, पण महाराष्ट्र जगला पाहिजे. कारण ती काळाची गरज आहे. ही सगळी मंडळी तुम्हाला त्यापासून दूर लोटत आहेत. तालुक्यात विकास करू शकलो नाही, उद्योगधंदे करू शकलो नाहीत, यासाठी विष कालवलं जात आहे. हे सर्व उद्योग यासाठी सुरू आहेत. आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की, सध्या काय राजकारण सुरू आहे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : ‘गुनसे’ म्हणत उद्धव ठाकरेंनी सांगितला राज ठाकरेंच्या पक्षाचा फुलफॉर्म

भिवंडीत भाषण न करता उपस्थितांशी संवाद साधला

दरम्यान, शुक्रवारी भिवंडी येथील प्रचारसभेवेळी राज ठाकरे यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांनी व्यासपीठावर न जाता थेट उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाल होते की, मी सगळीकडे बोलून आलो आहे. काय बोलायचे ते सांगितले आहे. माझी थोडीशी प्रकृती नाजूक असून थोडे बरे वाटत नाही आहे. म्हणून मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्हाला प्रत्यक्षात भेटलो, पण 20 तारखेला गाफिल राहू नका. आपले मित्र परिवार नातेवाईक या सर्वांना येत्या 20 तारखेला मनसेला मतदान करण्याचे आवाहन करा. तसेच, उमेदवार विजयी झाल्यावर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी नक्की पुन्हा येईन, असे आश्वासन देत त्यांनी आपले भाषण संपवले.

- Advertisement -

हेही वाचा –  Maharashtra Election 2024 : पवारांनी जितेंद्र आव्हाडांना मुख्यमंत्री केले तरी…; ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -