नाशिकमधील नांदगावमध्ये अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेनेचे ( शिंदे गट ) आमदार सुहास कांदे समोरा-समोर आले आहेत. सुहास कांदे हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप समीर भुजबळ यांनी केला आहे. काही ठिकाणी हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत.
सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदानला सुरूवात होत नाहीतोच नांदगावमध्ये राडा झाला. सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी अडवले. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे हे आमने-सामने आले.
हेही वाचा : शिंदे गटातील आमदाराच्या मुलाच्या कारवर हल्ला, ठाकरे गटातील नेत्यावर केले गंभीर आरोप; कुठे घडली घटना?
नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. गुरूकुल कॉलेज परिसरातून मतदार गाडीतून मतदानाला निघाले होते. यावेळी समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना अडवले. समीर कांदे हे मतदारांना पैसे देऊन गाड्यातून घेऊन जात असल्याचा आरोप समीर भुजबळांनी केला आहे.
समीर भुजबळ यांनी नांदगाव-मनमाड रस्त्यावर गाड्या अडवून धरल्या. यानंतर तिथे आलेले सुहास कांदेही चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. सुहास कांदे यांना पोलीस आणि कार्यकर्त्यांनी अडवून धरलं होतं. यावेळी सुहास कांदे यांनी ‘मर्डर फिक्स आहे,’ असं म्हणत एकप्रकारे भुजबळांना इशाराच दिला आहे.
हेही वाचा : तुमची मते किती? हे घे 4 हजार रूपये, धक्कादायक VIDEO समोर; दानवेंचा शिंदे गटातील आमदारावर आरोप