Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 2024 नव्हे, तर 'या' महिन्यात होणार लोकसभा निवडणुका; प्रकाश आंबेडकरांचा दावा

2024 नव्हे, तर ‘या’ महिन्यात होणार लोकसभा निवडणुका; प्रकाश आंबेडकरांचा दावा

Subscribe

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. देशात येत्या पाच महिन्यांत मध्यावधी निवडणुका होणार आहेत. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्येच लोकसभेच्या निवडणुका होतील, असा दावा प्रकाश आंबडेकर यांनी केला आहे.

येत्या 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीआधी राज्यातील विधानसभा निवडणुका होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. देशात येत्या पाच महिन्यांत मध्यावधी निवडणुका होणार आहेत. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्येच लोकसभेच्या निवडणुका होतील, असा दावा प्रकाश आंबडेकर यांनी केला आहे. आंबेडकर यांच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ( Not 2024 Lok Sabha elections will be held in October month Prakash Ambedkar s claim )

मोदी सरकारकडून यापूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अचानक रात्री 12 नंतर 500 व हजारच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा करण्यात आली होती. 30 डिसेंबर 2016 पर्यंतच बँक खात्यात हे चलन भरता येईल, असंही जाहीर केलं होतं. या निर्णयावरुन विरोधकांकडून मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा भारतीय रिझर्व्ह बँकेने 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, विरोधकांना निधी मिळू नये आणि त्याचबरोबर विरोधकांकडे निधी येऊच नये, यादृष्टीने टाकलेला हा खेळ आहे. त्यामुळे येथील राजकीय पक्षाने गाफील राहू नये. ऑक्टोबरमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागतीलच असं सूचक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

( हेही वाचा: ठाकरेंच्या कर्जतमधील फार्महाऊसमध्ये 2 हजारांच्या नोटा लपवल्या आहेत; राणेंचा गंभीर आरोप )

…म्हणून 2 हजारच्या नोटेवर बंदी

- Advertisement -

मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या नोटबंदीनंतर 2016 साली 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. मात्र, इतर नोटा चलनात पुरेशा उपलब्ध झाल्याने 2 हजार रुपयांच्या नोटेच्या उद्धिष्टाची पूर्तता झाली. त्यामुळे 2018-2019 मध्ये या नोटेची छपाई बंद करण्यात आली होती. चलनात असलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटांपैकी 81 टक्के नोटा या 2017 च्या आधी बाजारात आणण्यात आल्या होत्या. आता सामान्यत: व्यवहारांसाठी या नोटा वापरल्या जात नसल्याचं निदर्शनात आलं. तसंच व्यवहारासाठी लागणाऱ्या चलनाची पूर्तता इततर नोटा करत आहेत, असं रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -