कुठल्याही पक्षाचा नव्हे, फक्त एकीकरण समितीचाच उमेदवार; राज ठाकरेंनी ट्वीटमध्ये केली सुधारणा

राज ठाकरे यांनी आधी मराठी उमेदवाराला मतदान करा मग तो कोणत्याही पक्षाचा असो असं म्हटलं होतं परंतु आता त्यांनी बदल करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारालाच मतदान करा असं म्हटलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांना ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर एका युजरने उशिरा सुचलेलं शहाणपणं, असं म्हटलं आहे. 

MNS Activist in Badlapur, Ulhasnagar shocked by Raj Thackeray's hasty decision

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे. यादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, 8 मे ला कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टच्या माध्यमातून मतदारांना खास आवाहन केलं आहे. परंतु यादरम्यान त्यांनी आपली भूमिका बदलल्याचं दिसून आलं आहे. ( Not a candidate of any party only of the Integration Committee MNS Raj Thackeray corrected the tweet )

असा केला बदल

राज ठाकरे यांनी आधी मराठी उमेदवाराला मतदान करा मग तो कोणत्याही पक्षाचा असो असं म्हटलं होतं परंतु आता त्यांनी बदल करत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारालाच मतदान करा असं म्हटलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरे यांना ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर एका युजरने उशिरा सुचलेलं शहाणपणं, असं म्हटलं आहे.

( हेही वाचा: ‘प्रकरण माझ्याकडे येऊ द्या, मी १६ आमदारांना अपात्र करेन’; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांचे सूचक वक्तव्य )

बदललेलं ट्वीट काय? 

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनाच मतदान करा. इतर पक्षांचे उमेदवार मराठी असले तरी ते निवडून आल्यावर मराठी भाषेच्या गळचेपीविरोधात किंवा मराठी माणसांवर सीमाभागात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात विधानभवनात तोंड उघडणार नाहीत. तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही. मध्यंतरी जेंव्हा पुन्हा एकदा सीमावदाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेंव्हा मी म्हणलं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेंव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही. पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत. ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका.