घरमहाराष्ट्रपंतप्रधानपद नको रे बाबा! नितीन गडकरींची स्पष्टोक्ती

पंतप्रधानपद नको रे बाबा! नितीन गडकरींची स्पष्टोक्ती

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी चार वर्षांपूर्वी केंद्रात सत्तेवर आले खरे पण गेल्या चार वर्षातील त्यांच्या कारभारावर समाज माध्यमातून टीका सुरू झाली आहे. मोदींनी केवळ आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली, असा रोष आता व्यक्त होत आहे. त्याचवेळी पुढील निवडणुकीत त्यांच्याऐवजी केंद्रीय भूपृष्ठ आणि सागरी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सत्तेच्या चाव्या देण्यात याव्यात, अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र, खुद्द गडकरी यांनी या सर्व चर्चा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावल्या. आपण पंतप्रधान पदाचे दावेदार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना गडकरी म्हणाले, मी एक सामान्य माणूस आहे, छोटा कार्यकर्ता आहे. कुटुंबाची काळजी घेताना देशासाठी प्रामाणिकपणे जे शक्य आहे ते मी करु इच्छितो. पंतप्रधान बनण्याचे स्वप्न मी पाहत नाही आणि ते माझ्या मनातही नाही.

- Advertisement -

मला पूर्ण विश्वास आहे की आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आमचा पक्ष जिंकेल आणि नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील.
नितीन गडकरी हे भाजपचे बरेच अनुभवी नेते आहेत. गेल्या ४ वर्षांपासून केंद्रीय भूपृष्ठ आणि सागरी वाहतूक मंत्री म्हणून काम पाहत आहेत. आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याची त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होत होती. पण हा दावा त्यांनी फेटाळून लावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -