घरमहाराष्ट्रविजयाची नाही, आंदोलनाची रॅली काढणार; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शुभांगी पाटलांचा झंझावात

विजयाची नाही, आंदोलनाची रॅली काढणार; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शुभांगी पाटलांचा झंझावात

Subscribe

Shubhangi Patil in Parner | २ फेब्रुवारीला निकाल लागल्यानंतर विजयाची घोषणा झाल्यावर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याचं शुभांगी पाटील म्हणाल्या.

Shubhangi Patil in Parner | पारनेर – विद्यार्थ्यांचे असंख्य प्रश्न आहेत. पदभरती रखडली आहे. सुशिक्षित बेरोजगारी वाढली. या सर्वांचे प्रश्न विधिमंडळात मांडणार आहे. विजयी झाल्यानंतर विजयी रॅली नाहीतर आंदोलनाची रॅली काढणार आहे, असं आश्वासन महाविकास आघाडीच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार शुभांगी पाटील यांनी मतदारांना दिले. आज त्यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पारनेर येथे झंझावाती प्रचार केला.

हेही वाचा – शुभांगी पाटील निश्चित विजयी होतील एकनाथ खडसे

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून मी शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे मी आधीच ठरवलं होतं की जिंकून आल्यानंतर विजयाची रॅली नाही, आंदोलनाची रॅली काढणार आहे. त्यानुसार, २ फेब्रुवारीला निकाल लागल्यानंतर विजयाची घोषणा झाल्यावर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणार असल्याचं शुभांगी पाटील म्हणाल्या.

मी जिंकून आल्याने महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळणार आहे. पुरोगामी विचारांची आमदार मिळणार आहे. विधिमंडळात प्रश्न मांडेन आधी, मगच सत्कार घेईन, असंही शुभांगी पाटील म्हणाल्या. यावेळी त्यांनी अत्यंत भावनिक सादही घातली. मतदानाच्या रुपाने माहेरची साडी मागते. १६ उमेदवारांमध्ये आणि पाचही गटात एकटी महिला आहे. त्यामुळे माहरेची साडी द्या आणि म्हणा रेशमचा धागा म्हणून मोकळं सोडतोय पण काम करून आण, असं पाटील म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – सत्यजित तांबेंच्या प्रचारासाठी भाजपाचे आमदार मैदानात, पदवीधारांशी साधला संवाद

मी महाविकास आघाडीचीच

शुभांगी पाटील यांनी अपक्ष उमदेवार म्हणून अर्ज भरला असला तरीही त्या शिवसेनेच्या स्वीकृत उमेदवार आहे. तसंच, महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांनीही शुभांगी पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे मी महाविकास आघाडीची आहे. महाविकास आघाडीचीच राहणार आहे. तिथेच मला सुरक्षित वाटतं, असं शुभांगी पाटील म्हणाल्या.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -