घरट्रेंडिंगआज नही तो कभी नही ; युवतीही करताहेत ‘क्रश’ ला प्रपोज

आज नही तो कभी नही ; युवतीही करताहेत ‘क्रश’ ला प्रपोज

Subscribe

’व्हॅलेंटाईन्स वीक’ मुळे बाजारातही तेजी

 नाशिक :  ’व्हॅलेंटाईन्स वीक’ ची सुरुवात रोज डे’ ने अगदी जल्लोषात झाली. या आठवड्यातला दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे’. या दिवशी आपण ज्या व्यक्तीवर जिवापाड प्रेम करतो त्याला आपल्या मनातील त्याच्याविषयीच्या भावना आपण त्याच्यासमोर व्यक्त करतो. एखादा प्रेमवीर युवतीला प्रपोज करीत असल्याचा यापूर्वीचा अनुभव होता. परंतु ‘मॉडर्न जमान्यात’ मुली देखील मुलांना प्रपोज करीत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत झालेल्या स्थित्यंतरातील हा मोठा भाग असल्याचे बोलले जाते.

वर्षभर आपल्या मनातील प्रेम व्यक्त न करू शालेल्या युवकांना हा दिवस एक पर्वणीच असतो. धाडस करुन प्रेम व्यक्त करु इच्छिणारे अनेक तरुण-तरुणी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. यात आपल्या प्रेयसीला किंवा प्रियकराला प्रपोज केल्यावर होकार मिळण्याची संधी इतर दिवसांच्या तुलनेत अधिक असते. नव्वदिच्या दशकात प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेम पत्रांची मदत घेतली जायची, परंतु विज्ञान – तंत्रज्ञानाच्या झालेल्या प्रगतीमुळे आजकालची तरुण पिढी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करतांना दिसून येते.

- Advertisement -

सोशल मिडियाच्या माध्यमातून मिळालेल प्रेम फार काळ टिकत नाही अशी मान्यता आहे. परंतु मागच्या काही महिन्यांपूर्वी एका भारतीय तरुणाला जर्मनीच्या युवतीवर प्रेम झाले आणि सातार्‍यात चक्क फॉरेन वरुन ही तरुणी या युवकाच्या प्रेमापोटी भारतात दाखल झाली आणि त्यांच्या परिवारानेही त्यांचे प्रेम स्वीकार करत त्यांचे लग्न लावून दिले. कांदे लावतांनाचा जर्मनीच्या याच पाटलीनबाईच्या व्हिडिओने सोशल मिडियावर धुमाकूळ घातला होता. अनेक तरुण तरुणी एकमेकांवर प्रेम करतात फक्त ते नकाराच्या भीतीने त्याचे प्रेम व्यक्त करत नाही आणि याच भीतीमुळे त्याच्या प्रेमाची गोष्ट अपुरी राहून हाते. प्रेमात नकार जारी आला तरी हा आजचा प्रपोज डे नकार पाचवायची हिम्मत देतो. प्रपोज फक्त मुलेच करतात हा निव्वळ गैरसमज असल्याचे तरुणांशी बोलतांना लक्षात येते. आधुनिक जमण्यात मुलीही आपल्या ‘क्रश’ला प्रपोज करायला पुढे धजावतात. गंमतीचा भाग म्हणजे, ज्या मुलाला मुलीने स्वतःहून प्रपोज केल तो त्याच्या मित्रपरिवारात नशीबवान मानला जातो. शहरी भागात मुलींचे मुलांना प्रपोज करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे.ग्रामीण भागातही हळूहळू ’व्हॅलेंटाईन्स वीक’ साजरा होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. येणाऱ्या काही वर्षात शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही ’व्हॅलेंटाईन्स वीक’ साजरा होईल हे नक्की.

’व्हॅलेंटाईन्स वीक’ मुळे बाजारातही तेजी

’व्हॅलेंटाईन्स वीक’ सुरू होताच खरेदीसाठी तरुणाईची बाजारात वर्दळ दिसून येत आहे. आपल्या व्हॅलेंटाईनला खुश करण्यासाठी चॉकलेट, रिंग, विगवेगळ्या प्रकारचे परफ्युम्स, फोटो असलेल्या पिलोज, प्रिंटेड मग, रंगीबेरंगी फूल गिफ्ट म्हणून दिले जातात. यामुळे बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मागील वर्षाच्या तुलनेत फूल आणि इतर वस्तूंच्या किमतींमध्ये ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाली आहे.

व्हॅलेंटाईन्स वीक’ मध्ये युवक यंदा प्रिंटेड पिलो, प्रिंटेड मग, फोटो चेन, डायमंड रिंग, मिस्टरी बॉक्सला अधिक पसंती देत आहेत –  सोमेष तिवारी (समृद्धी गिफ्ट हाऊस)

- Advertisement -

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -