मुंबई : निवडणूकीच्या प्रचारात परस्परांच्या विरोधात होणारे आरोप-प्रत्यारोप, उमेदवारी मिळवण्यासाठी एका पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश, मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी होणारा पैशाचा वापर यामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण होते. परिणामी नोटाला मतदान करण्याचा पर्याय जागरुक मतदार निवडतात. पण लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात तुलनेत कमी मतदारांनी नोटाच्या बटणाचा पर्याय स्वीकारला असल्याचे मतदानाच्या आकेडवारीवरून दिसून आले आहे. (NOTA less popular in assembly elections than in Lok Sabha)
मुंबई शहरात 13 लाख 39 हजार 299 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर मुंबई दोन्ही उपनगरातील 43 लाख 34 हजार 513 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक विभागाकडील आकडेवारीनुसार 1.24 टक्के मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघात 46.06 टक्के मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकीत 75 हजार 262 मतदारांनी नोटाचे बटण दाबले होते. म्हणजे 1.40 टक्के नोटाला मतदान झाले होते. म्हणजेच लोकसभेपेक्षा विधानसभेत कमी मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे.
हेही वाचा – NOTA : रायगडमध्ये हजारो मतदारांचे नोटाला प्राधान्य, सर्वाधिक मते कुठल्या मतदारसंघात
नोटा म्हणजे काय?
दरम्यान, निवडणूक रिंगणात असलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार मतदाराला आवडत नसले तर अशा मतदारांनासाठी निवडणूक आयोगाने नोटाच्या बटणाचा पर्याय दिला आहे. नोटा म्हणजे नन ऑफ दी अबाऊव्ह असा अर्थ होतो. ईव्हीएमवर सर्व उमेदवारांचे नाव व पक्ष चिन्हाच्या खाली नोटाच्या बटणाचा पर्याय असतो. 2009मध्ये निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला नोटाचा पर्याय मतदारांना उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर नागरी हक्क संघटना पीपल्स युनियन फाँर सिव्हिल लिबर्टिज या स्वयंसेवी संघटनेने नोटाचे समर्थन करणारी जनहित याचिका 2013मध्ये न्यायालयात दाखल केली. त्यानंतर 2013मध्ये न्यायालयाने मतदारांना नोटाला पर्याय देण्याचे आदेश दिले. त्यानंतर ईव्हीएममध्ये नोटाच्या बटणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला.
विधानसभा मतदारसंघ आणि नोटाला पडलेली मते
- अणुशक्तीनगर – 3884
- सायन कोळीवाडा – 1980
- मलबार हिल – 2015
- कुलाबा – 1193
- मुंबादेवी – 1113
- चारकोप – 2313
- बोरीवली – 3637
- कांदिवली पूर्व – 2163
- मालाड पश्चिम – 1502
- चांदवली – 2247
- कुर्ला – 1594
- कलिना – 1667
- मुलुंड – 3834
- भांडूप – 2406
- विक्रोळी – 1709
- घाटकोपर पूर्व – 1719
- घाटकोप पश्चिम – 1387
- चेंबूर – 2018
- मानखुर्द शिवाजी नगर – 130
- माहीम – 1553
- वडाळा – 1708
- धारावी – 1756
- वरळी – 1562
- भायखळा – 1581
- शिवडी – 2460
- अंधेरी पश्चिम – 1822
- अंधेरी पूर्व – 1510
- दिंडोशी – 1530
- गोरेगाव – 1805
- दहिसर – 2191
- वर्सोवा – 1298
- जोगेश्वरी पूर्व – 2887
- मागाठाणे – 2818
- वांद्रे पूर्व – 1912
- वांद्रे पश्चिम – 1678
- विलेपार्ले – 2255
हेही वाचा – Politics : गुवाहाटीला आलेला आमदार पराभूत झाला तर राजकारण सोडेल; एकनाथ शिंदे निवृत्ती घेणार?