घरमहाराष्ट्रमराठी महिलेला घर नाकारलेल्या प्रकरणाची महिला आयोगाच्या अध्यक्षांकडून दखल; रुपाली चाकणकर म्हणाल्या...

मराठी महिलेला घर नाकारलेल्या प्रकरणाची महिला आयोगाच्या अध्यक्षांकडून दखल; रुपाली चाकणकर म्हणाल्या…

Subscribe

मुंबई : मुलुंड भागात तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला घर नाकरल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा संपूर्ण प्रकार तृप्ती देवरुखकरांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर मनसेच्या स्टाईने सोसायटीच्या सेक्रेटरीला माफी मागण्यास भाग पडाले. या घटनेची दखल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट केले आहे.

रुपाली चाकणकरांनी ट्वीटमध्ये म्हटले, “संबंधित घटनेविषयी आयोगाने तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर मध्यरात्री मुलुंड पोलीसांनी आरोपींवर तक्रार दाखल केली आहे. व तसेच सदरील कारवाई पूर्ण होईपर्यंत आयोग या घटनेचा पाठपुरावा करेल.”

- Advertisement -

रुपाली चाकणकरांनी ट्वीटमध्ये काय म्हणाल्या

भारतीय राज्य घटनेचे अनुच्छेद 15 अन्वये धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान या आधारावर कोणत्याही नागरिकासोबत भेदभाव करता येणार नाही अशी तरदुत करण्यात आली आहे. यामध्ये जात आणि भाषा अनुस्युत आहेत. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मध्ये सुद्धा विशिष्ट जाती, धर्म, भाषा यांना गृहनिर्माण संस्थेत घर देऊ नये अशी कोणतीही मुभा संस्थेला देण्यात आलेली नाही. असे असतानाही बहुतांश सहकारी गृहनिर्माण संस्था विशिष्ट जाती, धर्म, भाषा आणि आहार पद्धती या आधारावर उघडपणे भेदभाव करत आहेत. गृह योजनांच्या जाहिराती आणि वेबसाईटवरही फक्त ‘ गेटेड कम्युनिटी ‘ साठी असे ठळकपणे लिहिलेले असते.याबाबत सहकार विभाग आणि गृहनिर्माण विभाग यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे.

हेही वाचा – मराठी माणसाला घर देण्यास नकार देणारा व्हिडीओ व्हायरल; मनसेने शिकवला धडा

- Advertisement -

भाषावार राज्य निर्मितीच्या आधारावर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला आहे. असे असले तरी, महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत मराठी भाषिक महिलेला सदनिका नाकारली जाते, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे ह्या घटनेची दखल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली असून याप्रकरणी सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांना चौकशी करून अहवाल मागविण्यात आला आहे.त्याचप्रमाणे याप्रकरणी संबंधित महिलेला भाषेच्या आधारे दुय्यम वागणूक देऊन मारहाण करण्यात आल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस ठाणे यांना देण्यात आले आहेत.

हेही वाचा – “मराठी माणसाला घर नाकारणाऱ्यांवर कारवाई करणार की…”, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

व्हायरल व्हिडीओमध्ये तृप्ती देवरुखकरांनी नेमके काय म्हटले

जितके म्हणून राजकीय पक्ष आहेत त्या सर्वांनी मराठी पाट्या काढा. मराठी माणसाचा राजकारणासाठी वापर करणे बंद करा. मुंबईत मराठी माणसाची काय किंमत आहे ते जाणवलं. मुलुंड वेस्टमध्ये शिवसदन सोसायटीमध्ये ऑफिससाठी जागा पाहायला गेल्यानंतर त्या ठिकाणच्या गुजराती सेक्रेटरीने मराठी माणसांना घरं देणार नाही असं म्हटलं. नियमावली मागितली तर उलट धमकी दिली. पोलिसांना सांगा नाहीतर आणखी कुणाला सांगा असं सांगत आपला हात पकडला, पतीला धक्काबुक्की केली. शूट करायला गेले तर फोन काढून घेतला. यांना एवढा माज आलाय की महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला सांगतात की तुम्हाला सोसायटीमध्ये परवानगी नाही. मराठीच्या नावावर राजकारण करणारे कुठे आहेत? अशा माणसांना पोसत असाल तर दुर्दैव आहे. हे माझं रडणं नाही, तर संताप आहे. आज मला अनुभव आला तो प्रातिनिधीक आहे. अशा किती मराठी माणसांना हा अनुभव आला असेल आणि किती जणांना घरं नाकारली असतील? अशा आशयाचा व्हिडीओ तृप्ती देवरूखकर यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेत संबंधित व्यक्तीची कानउघडणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -