घरमहाराष्ट्रपृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस

पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस

Subscribe

चव्हाण यांना २१ दिवसांत या नोटिशीला उत्तर द्यावे लागणार

माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडे गेल्या १० वर्षांतील संपत्तीच्या विवरणाची मागणी करण्यात आली आहे. चव्हाण यांना २१ दिवसांत या नोटिशीला उत्तर द्यावे लागणार आहे.

पृथ्वीराज यांना ऐन दिवाळीतच आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. याबद्दलची माहिती त्यांनी बुधवारी माध्यमांना दिली. या नोटिशीला २१ दिवसांत उत्तर द्यायचे असून प्रत्यक्ष हजर राहण्यासही सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने आम्ही योग्य ती कार्यवाही करत आहोत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. ही नोटीस म्हणजे आयकर विभागाच्या नियमित प्रक्रियेचा भाग आहे. या नोटिशीला सविस्तर उत्तर देण्यात येईल, असे चव्हाण पुढे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -