घरताज्या घडामोडीनवनीत राणांच्या तक्रारीची संसदीय समितीकडून दखल; राज्यातील 'या' अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याचा...

नवनीत राणांच्या तक्रारीची संसदीय समितीकडून दखल; राज्यातील ‘या’ अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याचा आदेश

Subscribe

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आपल्याला जेलमध्ये योग्य वागणूक मिळाली नसल्याची तक्रार संसदीय समिती आणि लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. यावर संसदीय समितीने (Parliament) तक्रारीची दखल घेतली आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आपल्याला जेलमध्ये योग्य वागणूक मिळाली नसल्याची तक्रार संसदीय समिती आणि लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. यावर संसदीय समितीने (Parliament) तक्रारीची दखल घेतली आहे. या प्रकरणी आता 15 जूनला राज्यातील अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याचा आदेश देण्यात आले आहेत. 15 जूनला दुपारी 12:30 वाजता संसदीय समिती समोर ही सुनावणी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र DGP रजनीश सेठ, पोलीस आयुक्त संजय पांडे (Police Commissioner Sanjay Pande), भायखळा कारागृहाचे अधीक्षक यशवंत भानुदास यांना दिल्लीत हजर राहण्यास सांगितले आहे. शिवाय, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनाही 15 जूनला हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे संसदीय समिती याबाबत काय निर्णय घेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे नवनीत राणा म्हटले होते. याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हा पोलीस स्थानकात योग्य वागणूक मिळाली नसल्याचा आरोप राणा यांनी केला होता. आपण मागासवर्गीय जातीचे आहेत, म्हणून पोलिसांनी मला योग्य वागणूक दिली नाही असाही आरोप त्यांनी केला होता.

हेही वाचा – खासदार नवनीत राणांना जिवे मारण्याची धमकी

- Advertisement -

याशिवाय, नवनीत राणा आणि रवी राणा हे पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत बसले असल्याचा व्हिडिओच मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोस्ट केला. मात्र हा व्हिडिओ सांताक्रुझ पोलीस ठाण्यातील नसून हा व्हिडिओ खार पोलीस ठाण्यातील असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर जेलमधून सुटल्यानंतरही राणांनी अनेक गंभीर आरोप केले.

त्यानंतर, खासदार नवनीत राणा या जेलमधून सुटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांना मानचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. तसेच पोलिसांनी हे माहिती असूनही राणा यांना तुरुंगात योग्य वागणूक दिली नाही.

हेही वाचा – मी त्यांच्याशी समजूतदारपणे वागले संजय राऊत यांच्यासोबतच्या भेटीवर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया

आर्थर रोड जेल प्रशासनाने मुद्दाम राणा यांना फरशीवर बसण्यास आणि झोपण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांचा हा त्रास जास्तच बळावाल. तसेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची विनंती करुनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले, अशी तक्रार राणा यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. दरम्यान हे प्रकरण आता दिल्लीतल्या संसदीय समितीपुढे पोहोचले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना हे प्रकरण आता भोवणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – संभाजीराजेंची ठरवून कोंडी करण्यात आली, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -