घरताज्या घडामोडीशासकीय बंगले रिकामे करण्यासाठी शिवसेना-भाजपच्या माजी मंत्र्यांना नोटीस

शासकीय बंगले रिकामे करण्यासाठी शिवसेना-भाजपच्या माजी मंत्र्यांना नोटीस

Subscribe

युती काळातील भाजप आणि शिवसेनेच्या माजी मंत्र्यांनी अजूनही त्यांचे बंगले रिकामे केले नाहीत. त्यामुळे आता या माजी मंत्र्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिस बजावली आहे.

‘महाविकास’ आघाडीच्या कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना नुकतीच सामान्य प्रशासन विभागाने दालने आणि बंगले वितरित केले असून, या मंत्र्यांनी आता दालने आणि बंगल्याचा ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, युती काळातील भाजप आणि शिवसेनेच्या माजी मंत्र्यांनी अजूनही त्यांचे बंगले रिकामे केले नाहीत. त्यामुळे आता या माजी मंत्र्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिस बजावली आहे. यामध्ये माजी नऊ मंत्र्यांचा समावेश असून, त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने बंगले खाली करण्यासाठी नोटीस बजावली आहे.

या मंत्र्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने बजावली नोटीस –

– सुधीर मुनगंटीवार, भाजप, माजी अर्थमंत्री, नियोजन आणि वनमंत्री (देवगिरी, मलबार हिल)

- Advertisement -

– जयदत्त क्षीरसागर, शिवसेना, माजी जलसंधारणमंत्री (सातपुडा, मलबार हिल)

– रामदास कदम, शिवसेना, माजी पर्यावरण मंत्री (शिवगिरी, मलबार हिल)

- Advertisement -

– दीपक केसरकर, शिवसेना, माजी गृहराज्यमंत्री (अ-५, मादाम कामा मार्ग)

मदन येरावार, भाजप, माजी ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषध मंत्री (अ-३, मादाम कामा मार्ग)

– अविनाश महातेकर, रिपाई, माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री (सुरुची – १५, चर्चगेट)

– सुभाष देशमुख, भाजप, माजी सहकारमंत्री (सुरुची – ३, चर्चगेट)

– सुरेश खाडे, भाजप, माजी सामाजिक न्यायमंत्री (अवंती – ८)

– अर्जुन खोतकर, शिवसेना, माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री (रॉकी हिल टॉवर १२०३, ना दा मार्ग, मलबार हिल


हेही वाचा – ‘लग्नाच्या बोहल्यावर उभं राहण्याआधी नवरा पळला’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -