घरताज्या घडामोडीआता दादर रेल्वे स्थानकाबाहेर पकडा ई-टॅक्सी

आता दादर रेल्वे स्थानकाबाहेर पकडा ई-टॅक्सी

Subscribe

मध्य रेल्वेच्या महसूलात होणार वाढ

विमानतळाच्या बाहेर ओला, उबेर टॅक्सींसारख्या अनेक ई-टॅक्सी प्रवासासाठी हजर असतात. त्याच धर्तीवर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर ई-टॅक्सी दिसणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने निविदा सुध्दा काढण्यात आली आहे. या ई टॅक्सीसाठी मध्य रेल्वे दादर रेल्वे स्थानकाबाहेर जाग उपल्बध करुन देणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडताच लगेच ओला, उबेरसारख्या ई- टॅक्सी सेवेचा लाभ घेता येणार आहे.

रेल्वे प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्न करत आहे. वाढते डिजिटल युग लक्षात घेता मध्य रेल्वेने महत्वपूर्ण रेल्वे स्थानकांबाहेर प्रवाशांना निश्चित स्थळी पोहचण्यासाठी अ‍ॅप बेस्ट ई-टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून देण्याची सुरूवात केली आहे. या आगोदर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही योजना सुरु झाली आहे. आता मध्य रेल्वेचे प्रमुख रेल्वे स्थानक असलेल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर ई-टॅक्सी सेवा सुरु करण्यासाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. यासाठी मध्य रेल्वेने निविदा सुद्धा काढली आहे. निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यास मध्य रेल्वेला ३ लाख रुपये इतका महसूल मिळणार आहे. यासाठी मध्य रेल्वेने दादर रेल्वे स्थानकाबाहेर लवकरच पीक अ‍ॅप पॉईंट उभारण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना दादर रेल्वे स्थानकाबाहेरुन ई- टॅक्सी मिळणे सोपे होणार आहे. प्रवाशांनी स्मार्टफोन किंवा अ‍ॅपवरून टॅक्सीचे बुकिंग केल्यानंतर टॅक्सी स्टँडजवळ त्यांना तत्काळ टॅक्सी मिळेल.

- Advertisement -

हेही वाचा – जागतिक मंदी,करोनाचे अर्थसंकल्पावर सावट – अजित पवार


स्थानकावर पिक अप झोन

सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकावर ही सुविधा सुरु झाली आहे. त्यानंतर आता दादर, ठाणे, एलटीटी आणि पनवेल यांसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर ई- टॅक्सीसाठी पिक अप झोन तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या बाहेर या टॅक्सीसाठी खास पार्किंगची जागा निश्चित करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाचा विचार करत आहे.त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडतात लगेच ई टॅक्सीसारख्या यापुढे चालणार्‍या टॅक्सी सेवेचा लाभ घेता येईल.

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -