घर महाराष्ट्र माझा पराभव कसा झाला हे आता सर्वांनाच माहितीय; पंकजा मुडेंचा नाव न...

माझा पराभव कसा झाला हे आता सर्वांनाच माहितीय; पंकजा मुडेंचा नाव न घेता टोला

Subscribe

बीड : भाजप नेत्या (BJP) आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या शिवशक्ती परिक्रमेस नाशिक येथून सुरूवात झाली. त्या महाराष्ट्र दौरा करणार असून त्यांची शिवशक्ती यात्रा (Shiv Shakti Yatra) बीड (Beed) जिल्ह्यामध्ये पोहोचली. बीडच्या पाटोदा गावात पोहचल्यावर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, कार्यकर्ते दररोज फोन करून मला विचारतात ताई तुम्ही भेटायला येणार, पण महाराष्ट्रात माझ्याकडे कुठलीच जबाबदारी नाही. त्यामुळे देवदर्शनाच्या निमित्ताने त्यांना भेटायला आले आहे. (Now everyone knows how I was defeated Tola without naming Pankaja Mude)

पाटोद्यामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पंकजा मुंडे यांचे जोरदार स्वागत केलं. त्यांच्या स्वागतासाठी फुलाची उधळण देखील करण्यात आली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, चार वर्षाच्या काळात मी फक्त राजकीय दुःखच नाही तर खूप काही सहन केलं आहे. पण माझी नीतिमत्ता एवढी लेचीपेची नाही. सर्व काही सहन करत असताना मी माझं धैर्य ढळू दिलं नाही. मी सत्य आणि तत्वाचं राजकारण करत आहे, असं स्पष्ट मत पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केलं.

- Advertisement -

हेही वाचा – मनोहर जोशींचे घर पेट्रोल टाकून जाळण्यास सांगितले…; शिंदे गटाच्या आमदाराचा ठाकरे गटावर गंभीर आरोप

महाराष्ट्रात माझ्याकडे कुठलीच जबाबदारी नाही

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी आता बुद्धाच्या मार्गावर नाही तर, श्रीकृष्णाचा मार्ग अवलंबला आहे. आता फक्त कर्म करायचे आहे. त्यामुळं मला फळाची कुठलीही अपेक्षा नाही. यापुढे जे काही करायचं आहे ते फक्त जनतेसाठी. कारण जनताच माझं कर्म आणि माझा धर्म आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. अनेक कार्यकर्ते मला दररोज फोन लावून विचारतात ताई तुम्ही आम्हाला भेटायला का येत नाहीत. कारण महाराष्ट्रात माझ्याकडे कुठलीच जबाबदारी नाही, त्यामुळे मी तुम्हाला भेटायला कशी येऊ? असा प्रश्न उपस्थित करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी रखरखत्या रनात उतरले आहे. देवदर्शनाच्या निमित्ताने तुम्हाला भेटायला आले आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

- Advertisement -

हेही वाचा – ठाकरेंच्या जळगाव दौऱ्याआधी महाराष्ट्र शासनाचं महापालिका आयुक्तांना पत्र; संजय राऊत म्हणतात…

मुंडे साहेबांच्या नावाशिवाय मला माझी क्षमता सिद्ध करायचीय

गोपीनाथ मुंडेंबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज माझे बाबा आपल्यामध्ये नाहीत. त्यामुळं कदाचित त्यांनी जर मला विचारलं की, माझ्याशिवाय तू काय केलंस, त्यामुळे आता मला त्यांच्या नावाशिवाय स्वत:ची क्षमता सिद्ध करुन दाखवायची आहे. खरं तर मला माझं कर्तृत्व सिद्ध करून काहीही मिळवायचे नाही, कारण मी हे सगळं जनतेसाठी करत आहे. मी निवडणुकीत एकदा हरले, पण काही लोकांनी या गोष्टीचा खूप मोठी समस्या असल्यासारखे पाहिले. पण निवडणुकीमध्ये हार-जीत होत असते. गोपीनाथ मुंडे देखील एकदा पराभूत झाले होते. मात्र माझा पराभव कसा झाला हे आता सर्वांनाच कळलं आहे, असा टोलाही त्यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.

- Advertisment -