आता भविष्यातल्या लढाईची चिंता नाही; ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत. त्यांना एकूण 66 हजार 247 मते मिळाली. त्या पाठोपाठ ‘नोटा’ला 12 हजार 776 मते मिळाली. ऋतुजा लटके यांच्या या विजयानंतर 'मशाल भडकली आणि भगवा फडकला', असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

uddhav thackeray 2

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत. त्यांना एकूण 66 हजार 247 मते मिळाली. त्या पाठोपाठ ‘नोटा’ला 12 हजार 776 मते मिळाली. ऋतुजा लटके यांच्या या विजयानंतर ‘मशाल भडकली आणि भगवा फडकला’, असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच, “ही आता लढाईची सुरूवात झाली आहे. त्यामुळे मला भविष्यातील लढाईची चिंता नाही”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. (Now I don worry about the future uddhav thackeray talk on rutuja latke victory in andheri assembly by-election)

अंधेरी पोटनिवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटके यांनी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी “मधल्या कपट कारस्थानानंतर पहिली ही पोट निवडणूक झाली. आमचे चिन्ह आणि नाव गोठवले गेले. त्यानंतर मशाल ही निशाणी घेऊन आम्ही लढलो. मशाल भडकली आणि भगवा फडकला याचा मला अभिमान आणि आनंद आहे. या विजयाचे श्रेय शिवसैनिकांना आहेच. पण आमच्यासोबत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित, कम्यूनिश्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड आणि इतरांनी जी मेहनत घेतली”, असे म्हटले.

“ही आता लढाईची सुरूवात झाली आहे. त्यामुळे मला भविष्यातील लढाईची चिंता नाही. या निवडणुकीमध्ये एकजुटीने मिळून जसा विजय खेचून घेतला, तसेच याचा पुढचासुद्धा विजय सगळे एकत्र मिळून खेचल्याशिवाय राहणार नाही”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

“या निवडणुकीच्या निमित्ताने आमचे नाव आणि चिन्ह गोठवले होते. ज्याच्या मागणीने ते चिन्ह गोठवले. ते तर या निवडणुकीच्या रिंगणाच्या आजूबाजूला सुद्धा आले नाहीत. मात्र त्यांचे कर्तेकर्विते त्यांनी पहिल्यांदी अर्ज भरला. त्यानंतर त्यांना एकंदरीत अंदाज आला आणि त्यांनी माघार घेतली. त्यांनी जर निशाणीवर निवडणूक लढवली असती तर ही मते त्यांना मिळाली असती. त्यामुळे या निवडणुकीमध्ये नोटांचा वापर झाले हे उघड झालं”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला.

“आम्हाला निवडणूक चिन्ह महत्वाचे आहे. एका गोष्टीचे दु:ख आहे, की जे धनुष्यबाण गोठवले त्याची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पुजा करायाचे, त्यांच्या खोलीत अजुनही ते चिन्ह आहे. पण चिन्हापेक्षा वृत्ती ही महत्वाची असते, त्यामुळे या निवडणुकीतून जनता आमच्यासोबत आहे, हे स्पष्ट झाले”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.


हेही वाचा – ठाकरे गटाची मशाल धगधगली, अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ऋतुजा लटके विजयी