घरमहाराष्ट्रआता भाकरी फिरवायची वेळ आलीय; शरद पवारांनी दिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बदलाचे संकेत

आता भाकरी फिरवायची वेळ आलीय; शरद पवारांनी दिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बदलाचे संकेत

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. एवढचं नाही तर पक्षात याबाबत विलंब करुन चालणार नाही. पक्षातील लोकांना तसं सांगावं लागणार, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. एवढचं नाही तर पक्षात याबाबत विलंब करुन चालणार नाही. पक्षातील लोकांना तसं सांगावं लागणार, असंही शरद पवार यावेळी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीसंदर्भात शरद पवारांच्या या विधानाला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. पक्षात काही बदल होणार का? भाकरी फिरवणार म्हणजे नक्की काय, याची चर्चा काय सुरु झाली आहे. मुंबई विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आयोजित युवा मंथन कार्यक्रमात पक्षाच्या मुंबईतील युवा संघटनेशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.  ( Now is the time to turn the bread Sharad Pawar signaled change in NCP )

( हेही वाचा: अमित शाहांचा नागपूर दौरा रद्द, मोहन भागवतांच्या हस्ते होणार कॅन्सर इन्स्टिट्यूटचे लोकार्पण )

- Advertisement -

शरद पवार यांनी संघटनेत काम करणाऱ्या युवकांची वर्गवारी कशी करायची ते ठरवलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. वरच्या टप्प्यात कोणा कोणाला आणायचे त्याचा विचार करा. महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्यावतीने निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल. त्यामधून एक नवं नेतृत्व तयार केलं जाईल, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. आता विलंब करुन चालणार नाही. भाकरी फिरवण्याची वेळ आली. भाकरी फिरवली नाही तर ती करपते असंही वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

शरद पवारांनी व्यक्त केली खंत

शरद पवार म्हणाले की माझा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टीकोन असा आहे क यातून दृष्टी असलेल्या कार्यकर्त्यांची फळी आपल्याला महाराष्ट्रात तयार करायची आहे. ही फळी आपण तयार केली तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची ताकज आजच्या तरुणांमध्ये आहे, असं शरद पवार यावेळी म्हणाले. मुंबईत कार्यकर्त्यांची कमतरता नाही. मुंबई ती कार्यकर्त्यांची खाण आहे. मुंबई बदलते आहे, पण इथले सामान्य कुटुंब टिकलं पाहिजे. गिरणी कामगारांची मुंबई आपण पाहिली आहे. तेव्हा कष्टकरी वर्ग हा मोठा वर्ग होता. आत तो कष्टकरी दिसत नाही. या ठिकाणी असलेल्या गिरण्या गेल्या आहेत. तिथे मोठमोठ्या इमारती झाल्या आहेत. गिरणीत काम करणारा कष्टकरी कुठे आहे ते माहिती नाही, असं म्हणत शरद पवार यांनी खंत व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा बदलण्यासाठी आमचा युवक पुढे येतो आहे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -