Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश आता पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार 730 दिवसांची Child Care Leave

आता पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार 730 दिवसांची Child Care Leave

Subscribe

पुरुष कर्मचाऱ्यांना आता 730 दिवसांची रजा दिली जाणार आहे. तशी घोषणा लोकसभेत करण्यात आली आहे. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता स्त्रियांपाठोपाठ पुरुषांनाही बाल संगोपन रजा देण्यात येणार आहे

महिला कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी प्रसूती रजा दिली जाते. आता पुरुष कर्मचाऱ्यांसाठीही आनंदाची बातमी आहे. सरकारी पुरुष कर्मचाऱ्यांनाही आता बालसंगोपनासाठी रजा दिली जाणार आहे. पुरुष कर्मचाऱ्यांना आता 730 दिवसांची रजा दिली जाणार आहे. तशी घोषणा लोकसभेत करण्यात आली आहे. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता स्त्रियांपाठोपाठ पुरुषांनाही बाल संगोपन रजा देण्यात येणार आहे.( Now male employees will also get 730 days Child Care Leave Proclamation in Lok Sabha )

सरकारी कर्मचाऱ्यांपैकी महिला कर्मचारी मुलांच्या संगोपनासाठी रजा देण्याबाबत तरतूद होती. त्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी ही रजा घेण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला होता.

सरकारी नियम काय?

- Advertisement -

आज लोकसभेत लेखी उत्तर देत जितेंद्र सिंह म्हणाले की, 18 वर्षांपर्यंतच्या दोन मोठ्या मुलांच्या देखभालीसाठी, संपूर्ण सेवेदरम्यान जास्तीत जास्त 730 दिवसांपर्यंत रजा मंजूर करण्याची तरतूद आहे. ते म्हणाले की, दिव्यांग मुलाच्या बाबतीत वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.

काय म्हणाले जितेंद्र सिंह?

मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, केंद्रीय नागरी सेवा नियम, 1972 च्या नियम 43-सी अंतर्गत महिला सरकारी नोकरदार आणि केंद्रीय नागरी सेवा आणि पदांवर नियुक्त केलेल्या एकल पुरुष सरकारी सेवकांना बाल संगोपन रजेसाठी पात्र आहेत.

- Advertisement -

( हेही वाचा: केरळचे आता ‘असे’ होणार नामकरण, केंद्र सरकार करणार शिक्कामोर्तब )

 

- Advertisment -