घरमहाराष्ट्रआता बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांची तोंडे बंद होतील, चित्रा वाघ यांनी विरोधकांना सुनावले

आता बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांची तोंडे बंद होतील, चित्रा वाघ यांनी विरोधकांना सुनावले

Subscribe

मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमारामुळे राज्यातील राजकीय वातावारण चिघळले होते. त्यासंदर्भात माहिती अधिकारातून या लाठीमाराचे आदेश नेमके कोणी दिले ते समोर आले आहे. त्याबाबत भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्वीट केले आहे. आत्ता तरी बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांची तोंडे बंद होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – भारतीय क्रिकेटचे नेतृत्व भाजपाच्या ‘वंशवादा’कडे… ठाकरे गटाचा जोरदार हल्लाबोल

- Advertisement -

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता. त्यानंतर त्याविरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला गेला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर त्यावेळी जोरदार दगडफेकही करण्यात आली होती. जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीमाराचे आदेश कोणी दिले होते, असा प्रश्न विरोधकांनी केला होता. तर, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिलगिरी देखील व्यक्त केली होती आणि तसा आदेश गृह विभागाकडून दिला गेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तरीही जालन्यातील घटनेवरून फडणवीस यांच्यावर आरोप केले जात होते.

- Advertisement -

या सर्व पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी जालन्यातील लाठीमाराचे आदेश कुणी दिले होते, याची माहिती मागवली होती. त्यावर जालन्याचे पोलीस उपअधीक्षक आर सी शेख यांनी उत्तर दिले. आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश देण्यात आले नाहीत, असे त्यात म्हटले आहे.

हेही वाचा – “गरज पडल्यास मुंबईत कृत्रिम पाऊस पाडू”, मुख्यमंत्र्यांची वाढत्या प्रदूषणावर प्रतिक्रिया

म्हणूनच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी, हो गया दूध का दूध और पानी का पानी, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा कांगावा विरोधकांनी केला होता. उशीर लागला; पण सत्य बाहेर आले आहे. गृहमंत्री कार्यालयातून लाठीमार करण्याचे आदेश दिले गेले नव्हते, हे सत्य RTIमधून मिळालेल्या माहितीतून समोर आले आहे. त्यामुळे आत्ता तरी बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांची तोंडे बंद होतील, अशी अपेक्षा असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -