घरताज्या घडामोडीभोंग्यांविरोधात आता जनतेने रस्त्यावर उतरावे; शालिनी ठाकरेंचे जनतेला आव्हान

भोंग्यांविरोधात आता जनतेने रस्त्यावर उतरावे; शालिनी ठाकरेंचे जनतेला आव्हान

Subscribe

ज्या क्षणाला पोलिसांनी सभेवर अटी टाकल्या त्यावेळी हा विषय वेगळ्या प्रकारे पुढे जाणार असल्याचं वाटत होतं आणि तसच झालं. आम्हाला मिळालेल्या आदेशानुसार, आम्ही आदेशाचे पालन करणार

औरंगाबादमधील सभेसंदर्भात राज ठाकरेंविरोधा गुन्हा देखील दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे भोंगे उतरवण्याबाबत नेमकी काय भूमिका घेतात, याविषयी उत्सुकता ताणली गेली होती. याबाबत राज ठाकरेंनी आता जाहीर पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर आता मनसे नेत्या शालीनी ठाकरे यांनी भोंग्याविरोधात आता जनतेने रस्त्यावर उतरावे असं म्हटलं आहे.

“राज ठाकरें यांनी नागरिकांना आव्हान केलं आहे की, हा विषय कुठच्या पक्षाचा आणि राजकीय नाही. ज्या ज्या लोकांना त्रास होतो. त्यांनी जाऊन तक्रार करायला पाहिजे. तक्रार केल्यानंतर पोलीस पाऊल उचलावे लागते. त्यांना दखल घ्यावीच लागते. असे आव्हान राज ठाकरेंनी केलं आहे. तसंच हा काही एक दिवसाचा विषय नाही. सगळ्यांच्या यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. पुढे आपल्याला कायद्याचे पालन होण्यसाठी सर्व नागरिकांनी एकत्र यायला पाहिजे. राज ठाकरेंनी जो आवाज उठवलाय, तो नागरिकांसाठी उठवला आहे. पण नागरिकांनीही राज ठाकरेंच्या या आवाजाला पाठींबा देणे गरजेच आहे.”, असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं.

- Advertisement -

“ज्या क्षणाला पोलिसांनी सभेवर अटी टाकल्या त्यावेळी हा विषय वेगळ्या प्रकारे पुढे जाणार असल्याचं वाटत होतं आणि तसच झालं. आम्हाला मिळालेल्या आदेशानुसार, आम्ही आदेशाचे पालन करणार.”

“नोटीस आणि अशा कारवाई याआधी बऱ्याचवेळा झाल्या आहेत. आमच्या मनसैनिक पदाधिकारी आणि नेत्यांना वेळोवेळी नोटीस मिळतच असतात. त्यामुळं मला नाही वाटत आम्हाला त्यामध्ये जास्त लक्ष घालायला पाहिजे. आम्हाला जे कारायचे आहे ते आम्ही करणार.” असंही त्यांनी म्हटलं.

- Advertisement -

हेही वाचा – धर्मासाठी हट्टीपणा सोडणार नसाल, तर आम्हीही हट्ट सोडणार नाही; राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -