आता मुंबईत सायकलवरून मारा फेरफटका, आदित्य ठाकरेंच्या प्रस्तावाला पालिकेची परवानगी

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द होण्याच्या मार्गावर होता. पंरतु, तब्बल १५ महिन्यांनंतर मुंबई महापालिकेने हा प्रस्ताव बाहेर काढून या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला आहे.

cycle track on mumbai

मुंबई – येत्या काही वर्षांत तुम्हाला मुंबईच्या रस्त्यांवरून बिनधास्त सायकल सवारी (Cycle Ride) करता येणार आहे. कारण, माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या संकल्पनेनुसार वांद्रे किल्ला ते माहीम किल्ला दरम्यान ३.५९ किमी सायकल ट्रॅक आणि बोर्ड वॉर्क बांधण्यात येणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून २१८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचा – मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक, घराबाहेर पडताना ‘हे’ वेळापत्रक जरुर वाचा

मुंबईत अनेक जुनी पर्यटनस्थळे आहेत. मात्र, नव्याने पर्यटनस्थळे बनवण्यात आलेली नाहीत. मुंबई हे एक बेट असल्याने शहराच्या तिन्ही बाजूला समुद्र किनारा लाभला आहे. म्हणूनच, समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रेक्षणीय स्थळे उभारण्यात येणार आहे. यासाठी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये मुंबई महापालिकेकडे प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावानुसार, वांद्रे आणि माहीम या दोन किल्ल्यावंरच समुद्रकिनाऱ्यालगत सायकल ट्रॅक आणि बोर्ड वॉर्क बांधण्यात येणार आहे. मात्र, प्रस्ताव सादर करताच काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि भाजपाने विरोध केला होता.

हेही वाचा मुंबईच्या नेस्को मैदानात आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार, पक्षाला मिळणार नवी दिशा?

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द होण्याच्या मार्गावर होता. पंरतु, तब्बल १५ महिन्यांनंतर मुंबई महापालिकेने हा प्रस्ताव बाहेर काढून या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला आहे.

कसा पूर्ण होईल प्रकल्प

  • युनिक कन्स्ट्रक्शन-स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यात संयुक्त करार
  • २०२२- २०२३ आणि २०२४ -२०२५ या दोन अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद
  • येत्या १२ महिन्यांत हे काम पूर्ण करायचे आहे. या १२ महिन्यांतून पावसाळी कालखंड वगळण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या दीड वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.
  • प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १० वर्षे देखभाल दुरुस्ती कंत्राटदाराला करायची आहे.
  • मे.टंडन अर्बन सोल्युशन्स प्रा.लि. हे या प्रकल्पाचे सल्लागार असून त्यांना यासाठी ३६ लाख ६६ हजार ९४१ रुपये मिळणार आहेत.

    हेही वाचा
    – राज्यपाल हटविण्यासाठी मोहीम राबवली पाहिजे, आदित्य ठाकरेंची खोचक टीका