घरमहाराष्ट्रसोमय्यांकडून ठाकरेंच्या आणखी एका कंपनीचा गौप्यस्फोट, २९ कोटींच्या कंपनीची रजिस्टरमध्ये नोंदच नाही!

सोमय्यांकडून ठाकरेंच्या आणखी एका कंपनीचा गौप्यस्फोट, २९ कोटींच्या कंपनीची रजिस्टरमध्ये नोंदच नाही!

Subscribe

दादर येथील श्रीजी होम्सवरून (Shreeji Homes) मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं आहे. या कंपनीचा लेखाजोखा मांडत त्यांनी या कंपनीच्या व्यवहाराची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली. नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते.

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. दादर येथील श्रीजी होम्सवरून (Shreeji Homes) मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं आहे. या कंपनीचा लेखाजोखा मांडत त्यांनी या कंपनीच्या व्यवहाराची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली. नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या बोलत होते.

शिवाजी पार्क (Shivaji Park) कॅटरिंग कॉलेजजवळ श्रीजी होम्स नावाची इमारत उभी आहे. ही इमारत अद्यापही रिकामी असून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या निकटवर्तींयांची ही इमारत असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते म्हणाले की, ही इमारत कोणाची? ही कंपनी कोणाची? त्याचे मालक कोण? त्याचे पार्टनर कोण? पैसे कुठून आले? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रोख ठेवला.

- Advertisement -

श्रीजी होम्स नावाची कंपनी अद्यापही रजिस्टर (Register) झालेली नाही. ही कंपनी पार्टनरशीप फर्म (Patnership Firm) असून यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shreedhar Patankar), समवेद रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड (Samved Real Estate Private Limited), राहुल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड (Rahul Infra Private Limited) हे तिघे पार्टनर आहेत. समवेद रिअल इस्टेटमध्येही सर्वाधिक शेअर्स रश्मी ठाकरेंचे असल्याचा खळबळजनक दावाही किरीट सोमय्यांनी केला आहे.

दरम्यान, हा लेखाजोखा मांडताना श्रीजी होम्स नावाच्या कंपनीत ८९ टक्के रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे भागीदार आहेत. ही कंपनी २९ कोटी ६२ लाख ३२० रुपयांची असून अद्यापही रजिस्टर केलेली नाही. त्यामुळे या कंपनीच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -