Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE CoronaEffect: आता वैद्यकीय पदव्युत्तर परिक्षा जुनमध्ये होणार, नवे वेळापत्रक जाहीर

CoronaEffect: आता वैद्यकीय पदव्युत्तर परिक्षा जुनमध्ये होणार, नवे वेळापत्रक जाहीर

Subscribe

नाशिकमधील आरोग्य विद्यापीठाच्यावतीने घेण्यात येणारी वैद्यकीय पदव्युत्तर एमडी, एमएस, पदविका आणि एमएससी उन्हाळी सत्र दोन परिक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे.

नाशिकमधील आरोग्य विद्यापीठाच्यावतीने घेण्यात येणारी वैद्यकीय पदव्युत्तर एमडी, एमएस, पदविका आणि एमएससी उन्हाळी सत्र दोन परिक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे. विद्यापीठ आता ही परीक्षा जूनमध्ये घेणार असून नवे वेळापत्रक जाहीर केले आहे.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्याची रुग्णसेवेसाठी गरज लक्षात घेऊन विद्यापीठाने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नवे वेळापत्रक विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. नवीन वेळापत्रकानुसार १५ ते २२ जूनदरम्यान परीक्षा होणार आहे. परीक्षा अर्ज विद्यापीठात सादर करण्याची विना विलंब शुल्कासहीत अंतिम मुदत ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. तर विलंब शुल्कासहीत अंतिम मुदत ८ मे सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. अति विलंब शुल्कासहीत अंतिम मुदत १२ मेपर्यंत असेल, असेही विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

नवे वेळापत्रक असे असेल…

- Advertisement -

पेपर                          दिनांक                            वेळ

पेपर १                        १५ जून                         ११ ते २

- Advertisement -

पेपर २                        १७ जून                        ११ ते २

पेपर ३                        १९ जून                        ११ ते २

पेपर ४                        २२ जून                        ११ ते २

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ 

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली. कालच्या २२५वरून आता राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या २३२वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईत ४, नवी मुंबईत २ आणि पुण्यात एका रुग्णाची वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून लोकांना घरीच थांबून सहकार्य करण्याचं वारंवार आवाहन करण्यात येत आहे. त्यासोबत मुंबईतल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा देखील ९८ वर पोहोचला आहे.

हेही वाचा –

CoronaVirus सर्वेक्षणासठी आलेल्या आरोग्य सेविकांना नागरिकांनी केली दमदाटी

- Advertisment -