घरताज्या घडामोडीआता झारखंड ही लॉकडाऊन!

आता झारखंड ही लॉकडाऊन!

Subscribe

महाराष्ट्रासह झारखंड राज्यही ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

करोना व्हायरसचा पार्श्वभूमीवर सरकारच्या लॉकडाऊन निर्णयानंतर महाराष्ट्रासह झारखंड राज्यही ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, रेशन दुकाने, बँक/एटीएम, टपाल सेवा, रुग्णालये, मेडिकल स्टोर्स, पेट्रोल-डिझेल पंप इत्यादी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

- Advertisement -

परदेशातील नागरिकांनी आपला देशात येताना प्रथम आरोग्याची तपासणी करावी. तसेच क्वारनटाईनच्या कालावधीचे पालन करणे. सर्व नागरिक घरामध्ये राहतील. पाच पेक्षा अधिक नागरिक आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशा सूचना झारखंड सरकाने जारी केल्या आहेत.

महाराष्ट्र लॉकडाऊन

तिसर्‍या स्टेजवर असलेल्या करोनाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र येत्या ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यात कलम १४४ अर्थात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील रेल्वे, खाजगी बसेस एसटी सेवा बंद आहेत. उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याबाबत माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

आजपासून दिल्लीही लॉकडाऊन

आजपासून दिल्ली सुद्धा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आली आहे. यापूर्वी डेंग्यू या रोगावर महा अभियानाला साथ दिली. त्यामुळे मला विश्वास आहे की, कोविड-१९ पासून आपल्या परिवाराला वाचविण्यासाठी आपण लॉकडाऊनला सहकार्य कराल आणि करोनाची लढाई जिंकू, असे ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -