घरताज्या घडामोडीMaharashtra Corona: आपल्याला कोरोनासोबत जगावं लागेल - आरोग्यमंत्री राजेश टोपे

Maharashtra Corona: आपल्याला कोरोनासोबत जगावं लागेल – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Subscribe

राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार होताना दिसत आहेत. काल, गुरुवारी राज्यात २५ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट होत असून काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. पण तरीही काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्त करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. मात्र दुसऱ्याबाजूला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनासोबत आपल्याला जगावं लागेल असे म्हटले आहे. आज एका मराठी वृत्तावाहिनीशी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, ‘आपल्याला कोरोनासोबत जगण्यासाठी नियमावली बनवायला हवी. त्याच्यासाठी केंद्र आणि राज्याचे टास्क फोर्स एकत्र काम करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच अनेक देशात मास्क काढले जात आहेत, त्याबाबत इकडे तपासून निर्णय घेतला जाईल.’

नक्की काय म्हणाले आरोग्यमंत्री?

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘सध्या जो मुंबई, ठाणे, पालघर येथे कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर खूप कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. ही दिलासादायक बातमी आहे. परंतु पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद येथे कोरोना रुग्णसंख्या वाढतेय. महाराष्ट्राभरात ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढतेय तिथे ५ टक्क्यांच्या वर बेड्स ऑक्युपन्सी नाही. आयसीयू आणि व्हेंटिलेटवरचे रुग्ण १ टक्क्यांपेक्षा कमी आहेत. त्या अनुषंगाने मंत्रिमंडळाला आरोग्य विभागाने सादरीकरण दिले. त्यामध्ये युके, डेनमार्क, हॉलंड, युरोपीय देश, फ्रान्समध्ये मोठ्या पद्धतीने संख्या वाढतेय. पण त्याठिकाणी मास्कमुक्त, निर्बंध कमी केले आहेत. ही चर्चा जरुर घडवून आणली आणि सांगितले की, अशा पद्धतीचे आम्हालाही मार्गदर्शन करा. तसेच कुठल्याही परिस्थितीत आपण राज्य टास्क फोर्स, केंद्र टास्क फोर्स, आयसीएमआरने सर्वांना कळवेल पाहिजेत की, तो निर्णय विज्ञानावर आधारित असेल तर तो मग घेतला कसा? यासंदर्भात महाराष्ट्राला मार्गदर्शन व्हावे, अशी अपेक्षा राज्य मंत्रिमंडळाकडे व्यक्त केली. तशीच आम्ही सूचना आयसीएमआर, केंद्राच्या टास्क फोर्सला दिली आहे.’

- Advertisement -

‘दैनंदिन बरे होण्याचे प्रमाण बाधित होण्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आपल्याला कोविड बरोबर जगावे लागेल. अशा संकल्पनेतून आपल्याला पुढची वाटचाल करावी लागेल. पाश्चिमात्य देशातील वाढत असलेल्या संख्येदरम्यान त्या ठिकाणी निर्बंध कमी केलेत. त्या अनुषंगाने असे दिसतेय की, तेच मार्गदर्शन केंद्रशासन आणि आयसीएमआर, टास्क फोर्सने केले तर त्या अनुषंगाने योग्य ते निर्णय राज्य सरकारला घेता येऊ शकतील, असे मुख्यमंत्र्यांचे मत होते. त्या अनुषंगाने आम्ही निश्चित प्रकारची कार्यवाही करत आहोत आणि कोरोनाबरोबर कसे जगता येऊ शकेल, त्या दृष्टीकोनातून ज्या उपयायोजना असतील त्याचे आपल्याला लोकांनाही मार्गदर्शन, प्रबोधन करण्याची आवश्यकता येणाऱ्या काळात निश्चित प्रकार आहे,’ असे राजेश टोपे म्हणाले.


हेही वाचा – India Corona Update: देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, मात्र मृत्यूच्या संख्येत वाढ

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -