घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआता उन्हाळ कांदाही रडवणार?; गतवर्षीच्या तुलनेत "इतके' लाख मेट्रिक-टन उत्पादनवाढीचा अंदाज

आता उन्हाळ कांदाही रडवणार?; गतवर्षीच्या तुलनेत “इतके’ लाख मेट्रिक-टन उत्पादनवाढीचा अंदाज

Subscribe

नाशिक : सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या लाल कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकर्‍यांना कवडीमोल भाव मिळत असतांनाच आता आगामी म्हणजेच रब्बीचा कांदा ज्याला उन्हाळ कांदा लागवडही गतवर्षीच्या तूलनेत ९० लाख मेट्रीक टन अधिक होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे त्यामुळे लाल कांद्याबरोबरच उन्हाळ कांदाचे बंपर उत्पादन होण्याची शक्यता गृहीत धरून केंद्र सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानूसार केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत प्रत्यक्षात झालेला पीक पेरा, होणारे उत्पादन याचा अहवाल २० मार्च पर्यंत सादर करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले आहेत.

कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी,कांदा व्यापारी, कृषी, नाफेड व पणन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये सरकारविरोधात असंतोष आहे. नाफेडने खरेदी केंद्र सुरू केले असले तरी या केंद्रांच्या माध्यमातून व्यापार्‍यांचाच कांदा खरेदी केला जात असल्याचा आरोप जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शेतकर्‍यांनी केला. नाफेडच्या खरेदीनंतरही कांदा दरात सुधारणा होत नसल्याने शेतकर्‍यांना अनुदान देण्याची मागणी करण्यात येत आहे. जानेवारीत कांद्याला सरासरी १३९२ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. चालू महिन्यात आवक त्याच प्रमाणात असली तरी, दर मात्र ५०० ते ९०० रुपयांवर आले आहेत.

- Advertisement -

कांदा दर घसरल्यामुळे केंद्र सरकारने प्रथमच नाफेड मार्फत लाल कांद्याची खरेदी सुरु केली असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. जिल्हयात ४० ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असले तरी, या केंद्राबाबत माहितीच नसल्याने नाफेड हे व्यापार्‍यांकडील कांदा खरेदी करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी नाफेडच्या कामकाजाबाबत नाराजी दर्शवण्यात आली. मात्र शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी नाफेडचे केंद्र सुरू राहणे आवश्यक असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिलेल्या माहिती नुसार यंदा अंतिम रब्बी उन्हाळी लागवडीखालील क्षेत्र हे २ लाख २० हजार ८६४ हेक्टर असून त्याची प्रती हेक्टरी उत्पादकता ही २५ मेट्रीक टन निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा जवळपास ४५ लाख मेट्रीक टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. तर शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार जवळपास ३ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून उत्पादन हे ६० लाख मेट्रीक टन पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी रब्बी उन्हाळीचे क्षेत्र हे २ लाख ११ हजार हेक्टर होते. यंदा ते जवळपास १ लाख होक्टर ने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाल कांद्या सारखीच परिस्थिती रब्बी कांद्याची होण्याची शक्यता असून हा कांदाही शेतकर्‍याला रडवणार आहे. त्यामुळे रब्बीत कांदा दर कोसळणार नाही यासाठी आत्ताच उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मंत्री डॉ.भारती पवार यांनी सांगितले. या संदर्भात तात्काळ कृषी विभागाने रब्बी कांद्याचे प्रत्यक्ष लागवडी खालील क्षेत्र किती आहे. तसेच त्यातुन किती उत्पादन निघेल याचा सविस्तर अहवाल देण्याच्या सुचना दिल्या. हा अहवाल केंद्र सरकारला पाठवून त्याबाबत काय उपाययोजना करता येइल याचा विचार करु असे अश्वासन पवार यांनी शेतकरी,व्यापारी यांना दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -