घरमहाराष्ट्रलायसन्ससोबत नसतानाही बिनधास्त करा ड्रायव्हिंग

लायसन्ससोबत नसतानाही बिनधास्त करा ड्रायव्हिंग

Subscribe

आता गाडी चालवताना परवाना आणि वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र जवळ नसल्यास काळजी करण्याची गरज नाही.

दुचाकी किंवा चार चाकी कोणतीही गाडी चालवा. गाडी चालवायची असल्यास तुमच्याकडे गाडी चालविण्याचा परवाना असणे देखील तितकेच गरजेचे असते. विना परवाना गाडी चालवणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. एखाद्या वाहन चालकांने हेल्मेट घातले नसल्यास किंवा थ्रीपल सीट असल्यास किंवा इतर नियम मोडल्यास वाहनचालकाला बाजूला घेण्यात येते. नियम मोडणाऱ्या वाहनचालकाकडे सर्वप्रथम ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीबूकची विचारणा केली जाते. त्यामुळे गाडी चालवताना स्वत: सोबत कायम कागदपत्र घेऊन प्रवास करावा लागतो. मात्र आता तुनच्याकडे ही कागदपत्रे नसल्यास काळजीचे कारण नाही. कारण आता तुम्ही ही कागदपत्रे डिजीटल स्वरुपात दाखवू शकता. त्यामुळे आता तुम्ही बिनधास्त गाडी चालवू शकता.

डिजीटल स्वरुपात दाखवता येणार गाडीची कागदपत्र

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, वाहतूक आणि माहिती – तंत्रज्ञान मंत्रालयांनी मोटार वाहन कायदा १९८९ नुसार डिजीटल स्वरुपात देखील आता कागदपत्रे दाखवता येतील असा अध्यादेश काढला आहे. यासाठी ‘डिजिलॉकर’ सुविधेची सुरुवात करण्यात येत आहे. प्लेस्टोअरवर हे अॅप उपलब्ध आहे. या अॅपमध्ये सर्व कागदपत्रांच्या मुळ कॉपी स्कॅन करुन सेव्ह करु शकता. मात्र या व्यतिरिक्त कोणतीही कागपत्रे चालणार नसल्याचे देखील सांगण्यात आले आहे. भर रस्त्यामध्ये वाहतूक पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केल्यास मूळ प्रतीऐवजी मोबाईल अॅपवरील कागदपत्रांची स्कॅन कॉपी दाखवू शकता आणि ही कागदपत्र ग्राह्य धरण्यात येतील. त्यासाठी हे डिजिलॉकर वाहनचालकाच्या मोबाईलाही जोडले जाणार आहे. त्यामुळे ही जतन केलेली सर्व प्रमाणपत्र डिजिटल लॉकरमधून जगभरात कोठेही उपलब्ध होणार असल्यामुळे आता तुम्ही बिनधास्त गाडी चालवू शकता.

- Advertisement -

now you can drive without license


वाचा – हजारो वाहन परवाने ‘गहाळ’

- Advertisement -

असे सुरु कराल खाते

डिजीलॉकर या संकेतस्थळावर जाऊन किंवा प्लेस्टोअरमधून डिजीलॉकर हे अॅप डाऊनलोड करता येणार आहे. डाऊनलोड झाल्यानंतर त्यावर आपला आधार क्रमांक टाकून या अॅपवर लॉग इन करता येणार आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित नागरिकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येतो. तो अॅपवर भरल्यास संबंधित खाते कार्यान्वित होते. https://digilocker.gov.in या संकेतस्थळावर याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे.


वाचा – वाहन नियमांचे उल्लंघन पडणार महागात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -