मुंबई : 1975 आणि 1998 च्या अणू ऊर्जा चाचणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे अणूशास्त्रज्ञ डॉ. राजपोपाला चिदंबरम यांचे शनिवार, 4 जानेवार रोजी पहाटे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. ह (nuclear scientist rajagopala chidambaram death in mumbai big role pokhran nuclear test)
यासंदर्भात अणूऊर्जा विभागाने (DAI) एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. भारतातील सर्वात प्रतिष्ठित वैज्ञानिकांमध्ये समावेश होत असलेल्या डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे शनिवारी पहाटे 3 वाजून 20 मिनिटांनी निधन झाले. भारताच्या वैज्ञानिक धोरणांमध्ये त्यांचे अमूल्य योगदान होते. विज्ञान तसेच तंत्रज्ञानातील त्यांचे दूरदर्शी नेतृत्व कायमच सर्वांच्या स्मरणात राहील, असेही यात म्हटले आहे. 1936 मध्ये जन्मलेले डॉ. राजगोपाल चिदंबरम हे चेन्नई येथील प्रेसिडन्सी कॉलेज आणि बंगळुरूतील भारतीय विज्ञान संस्थेचे (IIT) माजी विद्यार्थी होते.
हेही वाचा – Gold Smuggling : मुंबई विमानतळावर पाच कोटींचे सोने जप्त; चौघांना अटक
चिदंबरम यांनी राष्ट्रीय पातळीवर अनेक महत्त्वाची पदे भूषवली. 2001 ते 2018 या काळात ते भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार होते. 1990 ते 1993 या काळात ते भाभा अणू संशोधन केंद्राचे (BARC) संचालक होते. अणू ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे सचिव यासह त्यांनी अनेक प्रमुख पदे भूषविली आहेत. 1994 ते 1995 पर्यंत आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा एजन्सीच्या (IAEA) बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. भारताच्या आण्विक क्षमता सिद्ध करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
पोखरण अणू चाचणीत महत्त्वाची भूमिका
1974 ला देशाच्या पहिल्या अणू चाचणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. तर 1998 मध्ये झालेल्या दुसऱ्या अणू चाचणीत त्यांनी अणू ऊर्जा विभागाच्या पथकाचे नेतृत्व केले होते. त्यांच्या या योगदानामुळेच भारत जागतिक पटलावर आण्विक शक्ती म्हणून आपले स्थान निश्चित केले. या क्षेत्रातील त्यांच्या कामामुळे भारतात आधुनिक पदार्थ विज्ञान संशोधनाचा पाया रचला गेला.
डॉ. चिदंबरम यांनी ऊर्जा, आरोग्यसेवा आणि सामाजिक आत्मनिर्भरता अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम केले आणि अनेक योजना देखील मार्गी लावल्या. यामुळे भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टीत प्रगती झाली आहे. भारतातील सुपर कॉम्प्युटरसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा विचार करणे आणि नॅशनल नॉलेज नेटवर्कच्या संकल्पनेत महत्त्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा – Modi Govt : संजय राऊत म्हणतात – नितीश कुमार एनडीएमध्ये राहतील का, याबाबत मला शंका!
चिदंबरम यांना 1975 मध्ये पद्मश्री आणि 1999 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अणूऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती यांनी चिदंबरम यांच्या निधनाने देशाचे खूप मोठे नुकसान झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.