नुपूर शर्मा प्रकरण महाराष्ट्रात तापलं! औरंगाबादमध्ये आंदोलन, अहमदनगरमध्ये पुकारला बंद

नुपूर शर्माला अटक करा, अशी मागणी करत हा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, सोलापूरसह अहमदनगरमध्येही नुपूर शर्मा यांच्या अटकेसाठी मुस्लिम बांधवांकडून आज बंदची हाक देण्यात आली.

aurangabad

पैगंबर मोहम्मद (Prophet Mohammad) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांच्याविरोधातील रोष दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यातच, सोलापूरमध्ये एमआयएमच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला. नुपूर शर्माला अटक करा, अशी मागणी करत हा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, सोलापूरसह औरंगाबाद, अहमदनगरमध्येही नुपूर शर्मा यांच्या अटकेसाठी मुस्लिम बांधवांकडून आज बंदची हाक देण्यात आली. (Nupur Sharma case heats up in Maharashtra! Movement in Aurangabad, call off in Ahmednagar)

हेही वाचा – भारताने का माफी मागावी? नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याला नेदरलँडमधील खासदाराचा पाठिंबा

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचे पडसाद आखाती देशांतही उमटले आहे. कानपूरमध्येही या वक्तव्यावरून जोरदार राडा झाला होता. महाराष्ट्रातील अनेक पोलीस ठाण्यातही त्यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच, मुंब्रा पोलिसांनी त्यांना समन्स बजावलं आहे. त्यानुसार, २२ जून रोजी त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा – सत्य बोलणं बंडखोरी असेल तर मग आम्ही पण बंडखोर आहोत –नुपूर शर्माला साध्वी प्रज्ञाचे समर्थन

दरम्यान, आज सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आणि औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एमआयएमकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी इम्तियाज जलीलसुद्धा उपस्थित होते. आंदोलनस्थळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित झाल्याने दिल्ली गेट परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरता खुद्द पोलीस आयुक्तही उपस्थित होते.

हेही वाचा कोण आहेत नुपूर शर्मा? ज्यांच्या एका वक्तव्यामुळे आखाती देशांनी पुकारला भारताविरोधात एल्गार

तर, दुसरीकडे अहमदनगरमध्ये बंदची हाक देण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी बंदची हाक दिल्याने अनेक ठिकाणी शुकशुकाट होता. अत्यंत शांततेत हा बंद पाळण्यात आला. देशात जातीय द्वेष पसरवणारं राजकारण बंद करण्याचे आवाहन मुस्लिम बांधवांनी केलं आहे.