घरमहाराष्ट्रOBC Melava : "पंढरपूरच्या देवाला पण जात लागली का?", छगन भुजबळांचा थेट...

OBC Melava : “पंढरपूरच्या देवाला पण जात लागली का?”, छगन भुजबळांचा थेट सवाल

Subscribe

ओबीसी महाएल्गार सभेच्या माध्यमातून सर्वच ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र डागले. मात्र, गावबंदी आणि पंढरपूरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बंदी घातल्याच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

जालना : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मराठा समाजाकडून लावून धरण्यात आली आहे. यासाठी मराठा समाजाच्यावतीने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. परंतु, त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांकडून कडाडून विरोध करण्यात आला. हाच विरोध दाखवून देण्यासाठी आज जालना जिह्यातील अंबड येथे ओबीसींची महाएल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या सभेला सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राजेश राठोड, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, ओबीसी नेते बबनराव तायवाडे, महादेव जानकर, आमदार देवयानी फरांदे हे उपस्थित होते. या सभेच्या माध्यमातून सर्वच ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र डागले. मात्र, गावबंदी आणि पंढरपूरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बंदी घातल्याच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. (OBC Melava: Ajit Pawar banned in Pandharpur, Chhagan Bhujbal’s direct question)

हेही वाचा – गोपीचंद पडळकरांनी केले छगन भुजबळांचे कौतुक, ओबीसींना एकजूट होण्याचे आवाहन

- Advertisement -

यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, यांच्या सातबाऱ्यावर आता देव सुद्धा लिहिले गेले आहेत. पंढरपुरला अजित पवारांनी यायचे नाही असे सांगण्यात आले आहे. काय रे ह्या पंढरपुराच्या देवाला सुद्धा जात लागली आहे का? या पंढरपुरच्या देवाची पूजा अनेक ओबीसींच्या संतांनी केली आहे. किती संतांची नावे सांगायची. मग याचा काय संबंध. पंढरपुरचा राजा हा सर्वांचा आहे. पण उपमुख्यमंत्र्यांनी यायचे नाही. का तर, आरक्षण देत नाही म्हणून. पण या आरक्षाणाचा संबंध काय? तसे पाहायला गेलो, खोलात गेलो तर पंढरपुरचा राजा म्हणजे कृष्णाचा अवतार आणि कृष्ण हा यादव कुळीचा. म्हणजे ओबीसी, अशी माहिती यावेळी सभेतून भुजबळांनी दिली.

त्यामुळे आता जातच लावायची आहे तर लावा जात. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की आता घाबरायचे नाही. मागे हटायचे नाही. कोणी काही केले तर त्याला शांतपणे उत्तर द्यायचे, असे आवाहनही छगन भुजबळ यांच्याकडून यावेळी उपस्थित ओबीसी समाजाला करण्यात आले. या सभेच्या माध्यमातून मनोज जरांगे यांच्यावर छगन भुजबळ यांच्यासहित अन्य ओबीसी नेत्यांनी थेट निशाणा साधला. गावात नेत्यांना बंदी करता, महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर आहे का?. यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल, असा थेट इशारा छगन भुजबळ यांच्याकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -