घरमहाराष्ट्रशरद पवार, फडणवीस....; मी यांची स्क्रिप्ट वाचतो, भुजबळांनी सगळंच सांगितलं

शरद पवार, फडणवीस….; मी यांची स्क्रिप्ट वाचतो, भुजबळांनी सगळंच सांगितलं

Subscribe

भुजबळ म्हणाले की, मला कोणीही स्क्रिप्ट लिहून देऊ शकत नाही, हे आतापर्यंत सर्वांनाच माहिती आहे.

मुंबई: मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला ओबीसी समजाचा विरोध आहे. त्यात मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ठिकठिकाणी सभा घेत आपला निषेध नोंदवला आहे. अशातच त्यांच्यावर अनेक नेत्यांकडून टीका केली जात असतानाच रोहित पवार यांनी भुजबळांना भाजप स्क्रिप्ट लिहून देत असल्याचं म्हटलं होतं. यावर आता भुजबळांनी पलटवार करत आपल्याला स्क्रिप्ट कोण लिहून देतं ते सांगितलं आहे. (OBC Morcha Sharad Pawar devendra Fadnavis Ajit pawar I read his script Chhagan Bhujbal told everything)

भुजबळ म्हणाले की, मला कोणीही स्क्रिप्ट लिहून देऊ शकत नाही, हे आतापर्यंत सर्वांनाच माहिती आहे. मला ना शरद पवार स्क्रिप्ट देत होते ना आता अजित पवार देतात, ना मला फडणवीस किंवा शिंदे स्क्रिप्ट देतात. मी मला जे बोलायचं आहे तेच बोलतो.

- Advertisement -

मागच्या 35 वर्षांपासून मी जे ओबीसी समाजाचं काम हातात घेतलं आहे. ते माझं स्क्रिप्ट छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांचं स्क्रिप्ट आहे. तसंच, ते मंडल आयोगाच आणि या देशातील बहुजन समाज, ओबीसींचं जे स्क्रिप्ट आहे, ते माझं स्क्रिप्ट आहे, असं म्हणत भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सर्व ओबीसी नेत्यांना आवाहन

भुजबळ म्हणाले की, मी एकटा संपूर्ण राज्यात जाऊ शकत नाही. परंतु बाकीच्या नेत्यांनी स्वतंत्र रॅली घ्यायल्या हव्यात. मला कोणी बोलवलं तर मी जाणार, नाही बोलवलं तर तुम्ही घ्या. परंतु ‘ओबीसी बचाव’चं जे आंदोलन आहे ते राज्यभर सुरू ठेवा, अशी माझी विनंती असल्याचंही ते यावेळी म्हणाले. कोणीही कुठेही जा, कोणत्याही पक्षात जा फक्त ओबीसी साठी लढा, असं आवाहनही भुजबळांनी यावेळी केलं.

- Advertisement -

जरांगेंच्या सभेवर प्रतिक्रिया

मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. यावर भुजबळ म्हणाले की, ते कुठेही येऊ शकतात. ही लोकशाही आहे. त्यांनी कुठेही सभा घ्याव्यात. मी काय गावबंदी आणि अमुकबंदी वगैरे करणार नाही. त्यांना शुभेच्छा, असा टोला भुजबळांनी लगावला.

(हेही वाचा: भाजपाच्या लोकांना चांगले दिवस आले; कॅसिनो प्रकरणी संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -